शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्टोबर महिन्यासाठी ४१९.६९ कोटी रूपये वितरित करण्यास मान्यता

By admin | Updated: September 7, 2015 23:30 IST

व्यापा-यांना स्थानिक संस्था करामधून सुटमुळे महानगर पालिकांच्या उत्पन्नात घट; त्यामुळे शासनाकडून महापालिकांना सहायक अनुदानाचे वितरण.

सुनील काकडे/वाशिम : ५0 कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापार्‍यांना स्थानिक संस्था करामधून सुट दिल्याने महानगरपालिकांना नुकसान सोसावे लागत आहे. तथापि, महापालिकांचे होणारे नुकसान भरुन काढण्यासाठी शासनाकडून महापालिकांना सहायक अनुदान दिले जाणार असून, त्यानुसार ऑक्टोबर महिन्यासाठी ४१९.६९ कोटी रूपयांचे अनुदान वितरित करण्यास सोमवारी मान्यता देण्यात आली. १ ऑगस्ट २0१५ पासून शासनाने महानगरपालिका क्षेत्रातील ५0 कोटी रूपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापार्‍यांना स्थानिक संस्था कर भरण्यापासून सुट दिली आहे. त्यामुळे महानगरपालिकांच्या उत्पन्नात मोठी तूट निर्माण झाली आहे. ती तूट भरुन काढण्यासाठी शासन संबंधित महानगरपालिकांना सहायक अनुदान देणार आहे. यासाठी वित्त विभागाने ऑगस्ट २0१५ ते डिसेंबर २0१५ या पाच महिन्याच्या कालावधीकरिता २0९८.४0 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. त्यानुसार, महानगरपालिकांना दैनंदिन खर्च भागविण्याकरिता ऑक्टोबर २0१५ साठी ४१९.६९ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने सोमवारी मान्यता दिली आहे. त्यापैकी मिरा-भाईंदर महापालिकेला १२.२७ कोटी, जळगाव ५.७९ कोटी, नांदेड-वाघाळा ३.७0 कोटी, वसई-विरार १५.९४ कोटी, सोलापूर १२.३७ कोटी, कोल्हापूर ६.४३ कोटी, औरंगाबाद ११.५७ कोटी, अहमदनगर ५.३८ कोटी, उल्हासनगर १0.११ कोटी, अमरावती ७.१४ कोटी, कल्याण-डोंबीवली १0.६६ कोटी, चंद्रपूर ३.४४ कोटी, परभणी १ कोटी, लातूर ९१ लाख, पुणे ८१.४१ कोटी, पिंपरी-चिंचवड ६६.४८ कोटी, नागपूर ३0.९८ कोटी, ठाणे ३५.७४ कोटी, नवी मुंबई ११.५४ कोटी, सांगली ७.७५ कोटी, भिवंडी-निजामपूर १४.६५ कोटी, मालेगाव ८.७३ कोटी, नाशिक ४५.८५ कोटी, धुळे ५.६३ कोटी, तर अकोला महापालिकेला ४.२२ कोटी रुपयाचा निधी वितरित केला जाणार आहे.