शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

‘अवैध सावकारी’त ३८१ तक्रारी; १०७ आरोपींवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 10:34 IST

१०७ आरोपींवर ९४ प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, ३५ जणांना ५७ हेक्टर शेती व एक फ्लॅट परत करण्यात आला आहे.

अकोला : अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी शासनाने महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अंमलात आणलेला आहे. हा कायदा लागू झाल्यापासून जिल्ह्यातील सहकार विभागाकडे ३८१ तक्रारी दाखल झाल्या. यापैकी २९८ प्रकरणात झडती घेण्यात आली आहे. यात कार्यवाही करत १०७ आरोपींवर ९४ प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, ३५ जणांना ५७ हेक्टर शेती व एक फ्लॅट परत करण्यात आला आहे.

एकेकाळी शेतकऱ्यांच्या मुळावर अवैध सावकारी मोठ्या प्रमाणात फोफावली होती. बँक कर्ज देण्यास समर्थ नसल्याने अनेक छोट्या व्यावसायिकांसह शेतकरी अडचणीच्या प्रसंगी सावकाराच्या दारात जाऊन आपली जमीन, घर गहाण ठेवून राहिला होता; परंतु बहुतांश प्रकरणात कर्जाची रक्कम अव्वाच्या सव्वा व्याजाने परत करूनही सावकारांनी शेतकऱ्यांच्या जमिनी परत करण्यास टाळाटाळ सुरू केल्याने आत्महत्येच्या संख्येत वाढ झाली. याची दखल घेऊन बेकायदेशीर सावकारीच्या समूळ उच्चाटनासाठी शासनाने महाराष्ट्र सावकारी अध्यादेश २०१४ हा सुधारित कायदा संपूर्ण १६ जानेवारी २०१४ रोजी लागू केला. या कायद्यानुसार खोट्या नावाने परवाना घेणे, नमूद पत्त्याव्यतिरिक्त किंवा कार्यक्षेत्राबाहेर सावकारी व्यवसाय करणे, दुसऱ्याच्या नावावर सावकारी करणे याबाबी आढळल्यास कारवाई होत आहे. हा कायदा लागू झाल्यापासून अकोला जिल्ह्यात सहकार विभागाकडे ३८१ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यात सर्वाधिक १४४ प्रकरणे अकोला तालुक्यातील आहेत. ३४ प्रकरणे जिल्हा उपनिबंधक यांच्या स्तरावरची आहे. कलम १६ नुसार ८१ जणांवर ६३ व कलम १८(१)नुसार २६ जणांवर ३१ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

 

दाखल तक्रारी

३८१

अवैध सावकार आढळलेली प्रकरणे

७७

दाखल गुन्हे

९४

आरोपी संख्या

१०७

 

अवैध सावकारी प्रकरणात तक्रारी येत आहेत. कागदपत्रांची पडताळणी करून योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. तक्रारदारांनी तक्रार देताना सबळ पुरावा व कागदपत्रे द्यावी. जेणेकरून कारवाई करण्यास अडचण येणार नाही.

विनायक कहाळेकर, जिल्हा उपनिबंधक

 

कागदपत्रांची अडचण

जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये अनेक तक्रारीत कागदपत्रांची अडचण निर्माण होत आहे. योग्य कागदपत्रे नसल्याने कारवाईत तथ्य आढळून येत नाही.

टॅग्स :Akolaअकोला