शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

अद्यापही ३८ टक्के रब्बी क्षेत्र नापेर!

By admin | Updated: December 7, 2015 02:31 IST

खरिपानंतर रब्बीवर परिणाम; तीव्र पाणीटंचाई.

अकोला : अल्प पावसाची झळ खरीप हंगामातील सर्वच पिकांना बसली. या परिस्थितीत रब्बी साथ देईल, अशी शेतकर्‍यांना आशा होती. परंतु भेगाळलेल्या शेताची स्थिती बघता आजमितीस पश्‍चिम विदर्भातील ३८ टक्के रब्बी क्षेत्र नापेर आहे. जमिनीत ओलावा नसल्याने पेरणी केलेल्या पिकांची वाढ खुंटल्याने पश्‍चिम विदर्भातील शेतकर्‍यांची झोप उडाली आहे. तसेच पाणीटंचाईचा सामना करताना शेतकर्‍यांना गुरांचा सांभाळ करणे कठीण झाले आहे.आतापर्यंंंत पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्हय़ांत ६२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पण, ज्या शेतकर्‍यांनी विविध रब्बी पिकांची पेरणी केली आहे. त्या पिकांसाठी लागणारा ओलावा जमिनीत नसल्याने रब्बी पिकांची अवस्था वाईट आहे. बहुतांश ठिकाणी हरभरा एकतर उगवला नाही, आणि जेथे उगवला तेथे कीड, मर रोगाने उच्छाद मांडला आहे. ज्या शेतकर्‍यांकडे संरक्षित पाण्याची सोय आहे; परंतु यावर्षी अपेक्षित जलसाठा संकलित झाला नसल्याने तेथे सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे अपेक्षित उत्पादनाची शाश्‍वती कमीच वाटत असल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.यावर्षीचा खरीप हंगाम हातचा गेल्याने रब्बी हंगामावर शेतकर्‍यांची भिस्त होती; परंतु परतीच्या पावसानेही दगा दिल्याने रब्बी हंगामातील उत्पादनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तथापि, कोरडे शेत ठेवून करायचे काय, म्हणून शेतकर्‍यांनी छातीवर दगड ठेवून रब्बीची पेरणी केली आहे. अमरावती विभागात ५.९३ लाख हेक्टर रब्बीचे सरासरी क्षेत्र आहे. तथापि कृषी विभागाने यावर्षी ९ लाख ५७ हजार हेक्टर पेरणीचे नियोजन केले होते. परंतु आतापर्यंंंत ३.६८ लाख हेक्टरवर पेरणी झाली असूून, उर्वरित उद्दिष्ट साध्य होते की नाही, याकडे कृषी विभागाचे लक्ष लागले आहे.