शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

३५ लाखांच्या रुई गाठीचे गौडबंगाल?

By admin | Updated: June 14, 2017 02:05 IST

२०० रुईगाठी नियोजित स्थळी न पोहोचल्यामुळे दोन ट्रकचालकांनी परस्पर लंपास केल्याच्या तक्रारीवरून अकोट ग्रामीण पोलिसांत ट्रकचालकांविरुद्ध ११ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : अकोट जिनिंग प्रेसिंगमधून ३५ लाख रुपयांच्या २०० रुईगाठी नियोजित स्थळी न पोहोचल्यामुळे दोन ट्रकचालकांनी परस्पर लंपास केल्याच्या तक्रारीवरून अकोट ग्रामीण पोलिसांत ट्रकचालकांविरुद्ध ११ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, रुई गाठींचा कंपनीकडून विमा काढण्यात येतो. त्यामुळे पोलिसांनी या लंपास झालेल्या रुई गाठींचा गौडबंगाल शोधून या प्रकरणाचा सखोल तपास करून छडा लावणे आवश्यक झाले आहे. हिवरखेड मार्गावरील गजानन जिनिंग पे्रसिंग फॅक्टरी व रामदेवबाबा कॉट्स स्पिन येथे अदिलाबाद येथील सालासर या निर्यातदार कंपनीसोबत २०० गाठींचा ३४ लाख ९८ हजार ९७९ रुपयांचा स्पॉट सौदा झाला. त्यानंतर सालासार कंपनीचे प्रतिनिधी कासम बशिरोद्दीन चव्हाण यांच्यासमक्ष या जिनिंगमधून २९ मे रोजी दोन ट्रकमध्ये प्रत्येकी १०० रुईगाठी भरून हे ट्रक सुयश कमोडिटिज प्रा. लि. स्वार पाटील वेअर हाऊस उरण मुंबई या पत्त्यावर सालासर कंपनीमार्फत पाठविण्यात आल्या. नंतर जिनिंग प्रेसिंगचा संबंध या व्यवहारातून संपला; परंतु कासम बशिरोद्दीन चव्हाण यांनी सदर रुईगाठी भरून रवाना केलेला ट्रक नियोजित स्थळी १ जून रोजी चौकशी केली असता पोहोचले नाहीत. त्यामुळे कासम बशिरोद्दीन चव्हाण यांनी अकोट पोलीस ठाण्यात एमएच ०४ एएफ २७४७ व एमएच ४३ यू ५९०५ क्रमांकाचा ट्रकचालक राकेशकुमार राजकुमार चर्च याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून अकोट ग्रामीण पोलिसांनी ११ जूनच्या उशिरा रात्री ट्रकचालक राकेशकुमार चर्च व दुसऱ्या अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध भादंविचे कमल ४०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, अनेकदा अनुचित घटना लक्षात घेता रुई गाठींसंदर्भात मार्जिन विमा उतरविण्यात येत असतो, त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास त्याचा मोबदला मिळतो. त्यामुळे पोलिसांनी रुई गाठीच्या लंपास प्रकरणाचा छडा लावणे गरजेचे झाले आहे.