शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात एकाच दिवशी ३४२ कोरोना पॉझिटिव्ह, आणखी एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:27 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ११५७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २८८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ११५७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २८८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ८६९ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये अकोट येथील ४९, डाबकी रोड येथील १०, खानापूर ता. पातूर व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी आठ, कौलखेड येथील सात, गीतानगर, मलकापूर, जठारपेठ व मोठी उमरी येथील प्रत्येकी पाच, तेल्हारा, खिरपुरी बु., जीएमसी, सिंधी कॅम्प, तापडीयानगर व रामदासपेठ येथील प्रत्येकी चार, बोरगाव मंजू, जिल्हा कोर्ट, बाळापूर, उगवा, मालीपुरा, गोडबोले प्लॉट व राम नगर येथील प्रत्येकी तीन, वस्तापूर, गजाननपेठ, तुकाराम चौक, अंदुरा, भीमनगर, कीर्ती नगर, केदार मंदीर, लहान उमरी, बाळापूर रोड व आश्रयनगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित कपिलेश्वर, अखातवाडा, खोबेरखेड, अपोती खु, अणकवाडी, अंबिकापूर, लाहोरा ता.बाळापूर, दुर्गा चौक, बोरगाव मंजू, भागवतवाडी, जवाहरनगर, बैदपुरा, नयागाव रोड, वाशिम बायपास, उमरी, विझोरा, रजपूतपुरा, हिंगणा रोड, जुने शहर, गायत्रीनगर, रिधोरा, खानापूर वेस ता.अकोट, आसेगाव ता.अकोट, अकोला जहॉगीर ता.अकोट, वनी वेताल ता.अकोट, रतनलाल प्लॉट, ज्ञानेश्वर नगर, शिवन नगर, पार्वती नगर, डिएसपी ऑफीस, राऊतवाडी, केशव नगर, सहकार नगर, पत्रकार कॉलनी,शास्त्री नगर, अशोक वाटिका, अकोट फैल, व्दारका नगरी, सातव चौक, रामदोगण प्लॉट, नरेंद्र नगर, गंगाधर प्लॉट, रणपिसे नगर, बार्शीटाकळी, वैष्णवी पार्क, पिंपळखुटा ता.बार्शिटाकळी, कान्हेरी सरप, आळदा ता.बार्शीटाकळी, चिंचोली बार्शीटाकळी, राधेनगर, खोलेश्वर लोहिया, मनकर्णा प्लॉट, सूधीर कॉलनी, तिलक रोड व मराठा नगर येथील प्रत्येकी एक अशा २२२ रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी गोरक्षण रोड येथील ११, कौलखेड व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी चार, जठारपेठ, केशव नगर, डाबकी रोड व मलकापूर येथील प्रत्येकी तीन, जवाहर नगर, खडकी, सहकार नगर, मूर्तिजापूर व उमरी येथील प्रत्येकी दोन, तुकाराम चौक, राम नगर, दुर्गा चौक, रतनलाल प्लॉट, पिकेव्ही क्वॉटर, बाळापूर रोड, लहान उमरी, हिंगणा रोड, कुरुम, तापडीया नगर, आनंद नगर, जूने शहर, अंबिका नगर, शास्त्री नगर, देशमुख फैल, कोठारी वाटीका, गोविंद नगर, तोष्णीवाल लेआऊट, कृषी नगर, पोलीस हेडक्वॉटर, संजय नगर, अकोट फैल, न्यु भीम नगर, रणपिसे नगर व जीएमसी येथील प्रत्येकी एक अशा ६६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

मूर्तिजापूर येथील पुरुष दगावला

कोरोनाला बळी पडणाऱ्यांचा आकडा वाढतच आहे. रविवारी मूर्तिजापूर येथील ८८ वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना १० फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.

८९ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १६, आयकॉन हॉस्पिटल येथून सात, ओझोन हॉस्पिटल येथून तीन, हॉटेल स्कायलार्क येथून चार, बिहाडे हॉस्पिटल येथून तीन, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून आठ, अवघाते हॉस्पिटल येथून सहा, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथून १०, तर होम आयसोलेशनचा कालावधी संपलेले ३२ अशा एकूण ८९ जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला.

१,९७९ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १३,९३५ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी तब्बल ११,५८५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत ३५३ जणांचा मृत्यू झाला असून सद्य:स्थितीत १,९७९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.