शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हय़ातील ३१0 गावांत ‘एक गाव, एक गणपती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:36 IST

गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या ‘एक गाव, एक गणपती’ या अभियानामध्ये जिल्हय़ातील ३१0 गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ बसविण्यात येणार आहे. जिल्हयातील ३१0 गावांत ‘एक गाव, एक गणपती’ची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशहरात २६४ मंडळे‘एक मंडळ, एक पोलीस कर्मचारी’

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या ‘एक गाव, एक गणपती’ या अभियानामध्ये जिल्हय़ातील ३१0 गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ बसविण्यात येणार आहे. जिल्हयातील ३१0 गावांत ‘एक गाव, एक गणपती’ची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाद्वारे जिल्हय़ात गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येतो. यासाठी अनेक गावांमध्ये एक किंवा त्यापेक्षा अधीक गणपती स्थापन करण्यात येतात. एकापेक्षा अधिक गणपतींची स्थापना केल्यानंतर अखेरच्या दिवशी दोन मंडळांमध्ये वाद होण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे पोलीस प्रशासनाद्वारे ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना मांडण्यात आली. यासाठी राज्यभर अभियान राबविण्यात आले असून, या अभियानाला अकोला जिल्हय़ात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जिल्हय़ातील ३१0 गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

शहरात २६४ मंडळेशहरामध्ये २६४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी नोंद केली आहे. या २६४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पोलीस प्रशासन सुविधा उपलब्ध करून देणार आहे. अकोला शहरात २६४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची नोंदणी करण्यात आली असून, जिल्हय़ातील आकडेवारी शुक्रवारी रात्रीपर्यंत पोलीस प्रशासनाकडे प्राप्त झाली नव्हती.

‘एक मंडळ, एक पोलीस कर्मचारी’अकोला जिल्हा पोलीस प्रशासनाद्वारे ‘एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, एक पोलीस कर्मचारी’ ही आगळी-वेगळी संकल्पना राबविण्यात आली आहे. यामध्ये अकोला शहरातील २६४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना २६४ पोलीस कर्मचारी समन्वय साधण्यासाठी देण्यात आलेले आहेत. हे पोलीस कर्मचारी पोलीस आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करणार असून ते मंडळाच्या पदाधिकार्‍यांना कायदेशीर मार्गदर्शन करणार आहेत.

जिल्हय़ातील ३१0 गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ची स्थापना करण्यात येणार आहे. यासोबतच शहरातही २६४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी नोंदणी केली असून, त्यांना एक कर्मचारी समन्वय साधण्यासाठी देण्यात आलेला आहे. अकोला शहर वगळता जिल्हय़ातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेही मोठय़ा उत्साहाने यामध्ये सहभागी झाले असून, हा उत्सव भक्तिभावाने, आनंदात व शांततेच्या मार्गाने साजरा करावा.- विजयकांत सागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, अकोला.