शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधी खचरूनही २६ पाणीपुरवठा योजना बंद!

By admin | Updated: June 23, 2016 00:49 IST

दोन प्रादेशिक आणि २४ स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांना मुहूर्त कधी हा प्रश्न अद्याप कायम आहे.

संतोष येलकर / अकोलाथकीत वीज देयक आणि देखभाल-दुरुस्तीअभावी कोट्यवधी रुपये खचरून बांधण्यात आलेल्या जिल्हय़ातील २६ पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. त्यामध्ये दोन प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना आणि २४ स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे. पाणीटंचाईच्या परिस्थितीत पाणीपुरवठा योजना बंद असल्याने, ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या निधीतून प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांची कामे करण्यात येतात. सन १९८५-८६ ते २0१0-११ या कालावधीत जिल्हय़ात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत बांधण्यात आलेल्या जिल्हय़ातील पाणीपुरवठा योजनांपैकी सातही तालुक्यात २६ पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. पातूर तालुक्यातील देऊळगाव-पास्टूल आणि आलेगाव-नवेगाव या दोन प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना आणि २४ स्वतंत्र पाणीपुरवठा योजना अशा २६ पाणीपुरवठा योजनांच्या कामांवर २६ कोटी ८७ लाख ५५ हजार रुपये खर्च करण्यात आले; परंतु संबंधित ग्रामपंचायतींकडून थकीत असलेले वीज देयक, देखभाल-दुरुस्तीचा अभाव, रखडलेले हस्तांतरण व नादुरुस्त झालेल्या योजना इत्यादी कारणांमुळे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या २६ ग्रामीण पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. ग्रामसभेच्या ठरावाअभावी दोन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद! जिल्हय़ातील पातूर तालुक्यातील देऊळगाव-पास्टूल आणि आलेगाव-नवेगाव या दोन प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या कामांवर २२ कोटी ३0 लाख रुपयांचा मार्च २0१२ पर्यंत खर्च करण्यात आला. योजनांची कामे करण्यात आली; मात्र या दोन्ही पाणीपुरवठा योजनांच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक असलेला ग्रामसभेचा ठराव अद्याप संबंधित ग्रामपंचायतींकडून देण्यात आला नाही. त्यामुळे या दोनही पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत.स्वतंत्र पाणीपुरवठा योजना बंद पडलेली गावे!अकोला तालुका:         अमानतपूर ताकोडा, खरप खुर्द, कळंबेश्‍वर, दोनवाडा.आकोट तालुका :        आसेगाव बाजार, महागाव गडी.बाळापूर तालुका :       तामशी, चिंचोली गनूूू, सांगवी जोमदेव.बाश्रीटाकळी तालुका :  गोरव्हा, कातखेड, खांबोरा, साखरविरा, किनखेड, किनखेड बु.तेल्हारा तालुका :        दापुरा -निंबोळी, भिली-बोरव्हा, भोकर-काळेगाव, मनब्दा.मूर्तिजापूर तालुका :    गौलखेड, वडगाव, सांगवा मेळ, राजुरा सरोदे.पातूर तालुका :           नांदखेड.