शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हारा तालुक्यात २६ पोलिस पाटलांची पदे रिक्त

By admin | Updated: July 10, 2014 01:30 IST

तेल्हारा तालुक्यातील २६ पोलिस पाटील व ११ गावातील कोतवालाची पदे रिक्त आहे.

तेल्हारा : प्रशासकीय दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार्‍या व गावातील घटना घडामोडीची माहिती पुरवणार्‍या पोलिस पाटील पदाचे २६ गावांत तर ११ गावांत कोतवाल पद रिक्त असल्याची माहिती मिळाली आहे. गावातील होणार्‍या प्रत्येक घडामोडीची माहिती पोलिस व महसूल विभागास देऊन गावात शांतता भंग होऊ नये म्हणून खबरदारी घेणार्‍या पोलिस पाटील पद २६ गावांत रिक्त आहेत. यामध्ये तळेगाव बु., कार्ला बु., तळेगाव खुर्द, शिवाजीनगर, हिंगणी खु., उमरशेवळी, जितापूर, पिंपरखेड, चन्नापूर, मोहापाणी, भिली, बोरव्हा, नया खेडा, मालठाणा बु., पिंप्री खुर्द, डवला, बाभूळगाव, पिवंदळ, मनब्दा, तळेगाव, पातुर्डा, गाडेगाव, जाफ्रापूर, वाकोडी, शेरी बु., दापुरा या २६ गावांत पोलिस पाटील पद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहेत तर ११ गावांत महसूल विभागाला माहिती पुरवणारे कोतवाल पद खंडाळा, अडगाव बु., मनब्दा, तेल्हारा खु., आकोली रुपराव, तेल्हारा बु., गाडेगाव, तळेगाव बाजार, खेलदेशपांडे, हिंगणी बु., मनात्री बु. येथील पद रिक्त आहे. पोलिस पाटील दाखल्यासाठी शाळकरी मुलांना व नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे तरी शासनाने तालुक्यातील पोलिस पाटील व कोतवाल पदे त्वरित भरण्याची मागणी होत आहे. शैलेश हिंगे, उपविभागीय अधिकारी, आकोट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांना माहिती पाठविण्यात आली असून, ही भरती जिल्हा स्तरावर होणार असून, पोलिस पाटील पदाची जाहिरात निघाल्यानंतर भरती करण्यात येणार असल्याचे सांगीतले.