शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम व्यावसायिकांना २५ लाखाने चुना!

By admin | Updated: September 13, 2014 01:12 IST

अकोला मनपा नगरसेवकांनी बांधकाम व्यावसायिकांना २५ लाखाने चुना लावला.

आशिष गावंडे / अकोलामनपा क्षेत्रात नियमापेक्षा जास्त बांधकाम केलेल्या इमारतींसाठी ह्यहार्डशिप अँन्ड कम्पाऊंडिंगह्णची नियमावली लागू करण्याच्या मुद्यावर काही नगरसेवकांनी बांधकाम व्यावसायिकांना २५ लाखाने चुना लावला. मनपा प्रशासन हार्डशिप अँन्ड कम्पाऊं डिंगचा नियम लागू करणार नसल्याचा ठराव काही नगरसेवकांनी पारित केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे; तर असा कोणताही ठराव सभागृहात झालाच नसताना, ठरावाची प्रत तयार झालीच कशी, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. महापालिका आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी नियमापेक्षा जास्त बांधकाम करणार्‍या १८७ बांधकाम व्यावसायिकांना नोटीस जारी करीत इमारतींचा सुधारित नकाशा सादर करण्याचे निर्देश दिले. मुळात एक चटई निदेशांक (एफएसआय) पेक्षा जास्त बांधकाम सर्रासपणे करण्यात आल्याने असा सुधारित नकाशा सादर करताना बांधकाम व्यावसायिकांच्या नाकीनऊ आले आहेत. सुधारित नकाशा नसेल तर बांधकाम पाडण्याचा इशारा आयुक्तांनी दिल्याने अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली. यामधून मार्ग काढण्यासाठी आयुक्तांनी मनपा क्षेत्रात जास्त बांधकाम केलेल्या इमारतींसाठी ह्यहार्डशिप अँन्ड कम्पाऊंडिंगह्णची नियमावली लागू करण्याचा प्रस्ताव २१ ऑगस्ट रोजी सर्वसाधारण सभेत मांडला. प्रशासनाने मांडलेल्या प्रस्तावात व्यावसायिक इमारतींसाठी ६0 टक्के तर रहिवासी इमारतींसाठी ४0 टक्के कराचा समावेश होता. हा प्रस्ताव मंजूर केल्यास मनपाला मोठे आर्थिक उत्पन्न प्राप्त होण्याची अपेक्षा होती. ही बाब काँग्रेस व भाजपमधील काही नगरसेवकांच्या लक्षात आल्याने हा विषय स्थगित ठेवण्याची मागणी सभागृहात करण्यात आली. त्यानुषंगाने तत्कालीन महापौर ज्यो त्स्ना गवई यांनी हा विषय स्थगित ठेवण्याचे निर्देश दिले होते; परंतु अचानक कोठे माशी शिंकली देव जाणे, पुढील महासभा होईपर्यंत हार्डशिप अँन्ड कम्पाऊंडिंगची नियमावली लागू न करता, इमार तींच्या संदर्भात कोणतीही कारवाई न करण्याचा ठराव सभागृहाने एकमताने पारित केल्याची बाब उघडकीस आली. तसा ठराव शहरातील काही बांधकाम व्यावसायिकांच्या हातावर टिकवण्यात आला. याबदल्यात काँग्रेस, भारिप-बमसं व भाजपमधील काही नगरसेवकांनी बांधकाम व्यावसायिकांजवळून २५ लाख रुपये लाटल्याची माहिती आहे.