शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अडीच लाख क्विंटल तुरीची आवक

By admin | Updated: March 20, 2017 02:43 IST

अकोला जिल्ह्यात विक्रमी उत्पादन; बाजार समितीसह नाफेड केंद्रावर खरेदी.

अकोला, दि. १९- कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नाफेडच्या शासकीय तूर खरेदी केंद्रावर यंदा अडीच लाखांवर तुरीची आवक झाली आहे. आणखी ४0 हजार क्विंटल तूर बाजारात येण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत तुरीची झालेली आवक यंदा दुप्पट आहे. हंगाम सुरू झाल्यापासून आतापर्यंत अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीकडे १ लाख क्विंटल तुरीची तर नाफेडच्या शासकीय तूर खरेदी केंद्रावर १ लाख ४0 हजार क्विंटल तुरीची आवक झाली. गतवर्षी बाजार समितीमध्ये दीड लाख क्विंटल तुरीची आवक झाली होती. गतवर्षी तुरीची आवक कमी झाल्यामुळे तुरीला दहा हजार रुपयांपर्यंत भाव मिळाले. त्यामुळे तुरीची डाळही प्रचंड महागली होती; परंतु यंदा मात्र तुरीची आवक तिपटीने वाढली असल्याने, यंदा तुरीचे भाव पाच हजारापर्यंत स्थिरावले आहेत. त्यातही तुरीचे ग्रेडेशन करण्यात आहे. दर्जेदार तुरीला चांगला भाव मिळत आहे. आतापर्यंत बाजार समिती आणि नाफेडच्या केंद्रावर अडीच लाखांवर तुरीची आवक झाली आहे. आणखी तुरीची आवक वाढण्याची शक्यता आहे. असा अंदाज नाफेडच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला. बाजार समितीमधील व्यापार्‍यांच्या तुलनेत नाफेडच्या खरेदी केंद्रावर तुरीला ५00 रुपये अधिक भाव मिळत असल्याने, शेतकरी नाफेडला पसंती देत आहेत; परंतु ज्या शेतकर्‍याला पैशांची निकड असल्याने, ते आपला माल व्यापार्‍याकडे विकत आहेत. पैसे रोख किंवा धनादेशाने मिळत असल्याने, काही शेतकरी खासगी व्यापार्‍यांना तूर विकत आहेत. सद्यस्थितीत बाजार समितीमध्ये १५ हजार क्विंटल तूर मापाच्या प्रतीक्षेत आहे. नाफेडच्या खरेदी केंद्रावर दोन ते तीन हजार क्विंटल तुरी खरेदी होत असल्याने, शेकडो शेतकर्‍यांना मापासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. नाफेड केंद्राबाहेर शेतकर्‍यांच्या रांगा कायम आहेत. बाजार समितीच्या आवारात ४00 वर ट्रॅक्टर, ट्रॉली उभ्या आहेत. शेतकर्‍यांची गर्दी वाढत असल्याने, नाफेडच्या खरेदीवर परिणाम होत आहे. शेतकर्‍यांना करावा लागत आहे मुक्कामनाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर तूर घेऊन आलेल्या शेतकर्‍यांना गर्दीमुळे मुक्काम करावा लागत आहे. एवढेच नाहीतर मालवाहू वाहन किंवा ट्रॅक्टर मालकाला अतिरिक्त भाडे द्यावे लागत आहे. बाजार समितीच्या आवारात तुरीने भरलेल्या ट्रॉली उभ्या असल्याने, सात ते आठ दिवस शेतकर्‍यांना मापासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.