शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याचे २00 कट्टे लंपास

By admin | Updated: July 9, 2014 00:29 IST

शेतकर्‍याच्या शेतामधून अज्ञात चोरट्यांनी कांद्याचे २00 कट्टे लंपास केल्याची घटना घडली.

तेल्हारा: तालुक्यातील बेलखेड शेतशिवारातील शेतकर्‍याच्या शेतामधून अज्ञात चोरट्यांनी कांद्याचे २00 कट्टे लंपास केल्याची घटना सोमवार ७ जुलैच्या मध्यरात्री घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बेलखेड येथील शेतशिवारात नरेंद्र पालीवाल यांचे फार्महाऊस आहे. त्यांनी यावर्षी पिकविलेला २00 कट्टे कांदा याच फार्महाऊसमध्ये ठेवला होता. कांद्याचे भाव वाढल्यानंतरच विकण्याच्या उद्देशाने त्यांनी हा कांदा ठेवला होता. सोमवार ७ जुलैच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या फार्महाऊसमधून जवळपास दीड लाख रुपये किंमत असलेल्या कांद्याचे २00 कट्टे लंपास केले. मंगळवारी सकाळच्या सुमारास नरेंद्र पालीवाल आपल्या शेतात गेले असता त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी सदर घटनेची तक्रार पोलिसांत दिल्यानंतर तेल्हारा पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा करीत भादंविच्या कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल के ला. या प्रकरणी हेकाँ राजू इंगळे, पुढील तपास करीत आहेत. उल्लेखनीय बाब अशी, की गेल्या अनेक दिवसांपासून शहरासह संपूर्ण तालुकाभरात चोरटे सक्रि य झाल्याच्या अफवा पसरल्यामुळे ग्रामस्थ रात्रभर जागरण करीत असतानाही हा प्रकार घडला.