शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

रोज २0 टन कांदा, बटाट्याचा साठा, आता प्रतीक्षा साठा निश्‍चितीची

By admin | Updated: July 7, 2014 00:55 IST

अकोला-जिल्ह्यात रोज कांदा आणि बटाट्याची प्रत्येकी ४0 टन उलाढाल होते.

अकोला-जिल्ह्यात रोज कांदा आणि बटाट्याची प्रत्येकी ४0 टन उलाढाल होते. सरकारने कांदा आणि बटाट्याचा समावेश जीवनावश्यक वस्तू कायद्यामध्ये केल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही पाहणी करण्यात आली. जिल्ह्यात रोज कांदा आणि बटाट्याची प्रत्येकी २0 टन खरेदी-विक्री होते. अर्थात रोज २0 टनापेक्षा जास्त कांदा आणि आलूचा साठा होतो. त्यामुळे आता शेतकरी आणि व्यापार्‍यांचे साठा निश्‍चितीकडे लक्ष लागले आहे. दिवसेंदिवस भाजीपाल्यासह कांदा, बटाट्यांच्या किंमती वाढतच आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा आणि बटाट्याचा समावेश जीवनावश्यक वस्तू कायद्यामध्ये केल्यानंतर साठेबाजीला लगाम लागणार आहे. व्यापार्‍यांच्या कांदे-बटाट्याच्या साठय़ाची र्मयादा ठरविण्याचे आदेशही केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत. राज्यातील कांदा आणि बटाट्याचे उत्पादन लक्षात घेऊन साठय़ाची र्मयादा निश्‍चित करण्यात येणार आहे. कांदा आणि बटाट्याला कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यातून एका वर्षासाठी बाहेर काढण्याचा निर्णय घेतल्याने शेतकरी कोणालाही कांदा व बटाटे विकू शकतील आणि याला बाजार समिती अटकाव करू शकणार नाही. दरम्यान, अकोल्यात वाडेगावसह वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातून कांदा विक्रीसाठी येतो. अकोल्यात कांदा- बटाटे खरेदीदार कमी असून, केवळ कमिशन तत्त्वावरच खरेदी-विक्री होते. बाजार समिती परिसरात अनेक व्यापार्‍यांनी कांदे आणि बटाट्यांची साठवणूक केली आहे. राज्य सरकारने साठा निश्‍चित केल्यानंतर साठेबाजीबाबत कारवाई होणार आहे. ** मोठे व्यापारी बनले शेतकरी जिल्ह्यात कांदा-बटाट्यांची कमिशन तत्त्वावर खरेदी-विक्री करणारे अनेक व्यापारी आहेत. हे व्यापारीच शेतकरीही आहेत. त्यामुळे साठा निश्‍चित करताना नेमके कोणते निकष लावण्यात येतात, याकडे व्यापार्‍यांचे लक्ष लागले आहे. अद्याप केंद्र आणि राज्य सरकारने अध्यादेश जारी केलेला नाही.