शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

कावड मार्गावरील २ कि.मी. ‘पॅचिंग’चे काम सुरू करा!

By admin | Updated: September 3, 2015 01:53 IST

जिल्हाधिका-यांनी केली कावड मार्गाची पाहणी; रस्ता दुरूस्तीचे दिले निर्देश.

जिल्हाधिका-यांनी केली कावड मार्गाची पाहणी; रस्ता दुरूस्तीचे दिले निर्देश. अकोला : श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी ७ सप्टेंबर रोजी अकोल्यात कावड उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकारी तथा महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त जी.श्रीकांत यांनी बुधवारी राजराजेश्‍वर मंदिरापासून गांधीग्रामपर्यंत १६ किलोमीटर कावड उत्सव मार्गाची पाहणी करून, या मार्गावरील २ किलोमीटर रस्त्याच्या ह्यपॅचिंगह्णचे काम गुरुवारपासून सुरू करण्याचे निर्देश मनपाच्या अधिकार्‍यांना दिले. श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी अकोला शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्‍वराला जलाभिषेक करण्यासाठी कावड उत्सव साजरा केला जातो. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त जी.श्रीकांत यांनी श्री राजराजेश्‍वर मंदिराला भेट देऊन, राजेश्‍वर मंदिरापासून गांधीग्रामपर्यंत कावड मार्गाची पाहणी केली. कावड मार्गावरील १६ किलोमीटर रस्त्यावरील खड्डे पडलेल्या २ किलोमीटर रस्त्याच्या पॅचिंगचे काम गुरुवारपासून सुरू करण्याचे निर्देश मनपाच्या संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना ज्लिहाधिकार्‍यांनी दिले. तसेच कावड उत्सवादरम्यान करावयाच्या विविध उपाययोजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या. त्यामध्ये प्रामुख्याने कावड मार्गावरील वाहतूक वळती करण्याच्या सूचना वाहतूक शाखेला देण्यात आल्या असून, कावड उत्सवादरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना पोलीस विभागाला देण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकार्‍यांसोबत अकोल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसीलदार संतोष शिंदे, मनपा व इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ढोल-ताशे इत्यादी वाद्यांसह पारंपरिक पद्धतीने कावड उत्सव भाविकांनी साजरा करण्याचे आवाहन करीत, उत्सवाची प्रशासनामार्फत तयारी करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी सांगितले.