शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १७ सरपंच अविरोध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 02:00 IST

अकोला : जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येत असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर (बुधवारी) जिल्हय़ात १७ उमेदवारांची सरपंच पदांसाठी अविरोध निवड करण्यात आली असून, ७७७ उमेदवारांची ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी अविरोध निवड करण्यात आल्याचे चित्र स्पष्ट झाले.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक ७७७ सदस्यांची अविरोध निवड

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येत असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर (बुधवारी) जिल्हय़ात १७ उमेदवारांची सरपंच पदांसाठी अविरोध निवड करण्यात आली असून, ७७७ उमेदवारांची ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी अविरोध निवड करण्यात आल्याचे चित्र स्पष्ट झाले. जिल्ह्यातील सातही तालुक्यात पाच वर्षांचा कालावधी संपणार्‍या २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येत आहेत. त्यामध्ये थेट जनतेतून निवड करावयाच्या सरपंच पदांसह ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांपैकी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवार, २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. या मुदतीपर्यंत सरपंच पदांसाठी प्रतिस्पर्धी उमेदवारांचा अर्ज नसल्याने आणि प्रत्येकी एकच अर्ज दाखल असल्याने, जिल्ह्यात १७ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी १७ उमेदवारांची सरपंचपदी अविरोध निवड करण्यात आली. तसेच ७७७ उमेदवारांची ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी अविरोध निवड करण्यात आली. १७ उमेदवारांची सरपंच पदांसाठी अविरोध निवड घोषित करण्यात आल्याने, जिल्ह्यातील २७२ पैकी २५५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. तसेच २ हजार ११८ ग्रामपंचायत सदस्य पदांपैकी ७७७ उमेदवारांची सदस्य पदांसाठी अविरोध निवड करण्यात आल्याने, उर्वरित १ हजार ३४१ सदस्य पदांसाठी ७ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. 

अविरोध निवड झालेलेअसे आहेत ग्रा.पं. सदस्य!जिल्ह्यात  ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी ७७७ उमेदवारांची अविरोध निवड झाली आहे. त्यामध्ये तेल्हारा तालुक्यात -९५, अकोट-८७, मूर्तिजापूर -१७४, अकोला -१४३, बाळापूर-५0, बाश्रीटाकळी - १५५ व पातूर तालुक्यात ७३ उमेदवारांची ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी अविरोध निवड करण्यात आली.