शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

१६२ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By admin | Updated: July 5, 2017 01:37 IST

ग्रामीणमधील ९१ तर शहरातील ७१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी मंगळवारी पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदलीची दुसरी यादी जाहीर केली. यादीमध्ये १६२ पोलीस कर्मचाऱ्यांची जिल्ह्यातील व शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये बदली करण्यात आली आहे. यामध्ये एएसआय, पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस शिपाई यांचा समावेश आहे. रमजान ईद उत्सवातील बंदोबस्तामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. तीन महिन्यांपूर्वीच पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील व शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये पाच वर्षे सेवा पूर्ण केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची यादी मागविली होती आणि यादीनुसार बदलीसाठी पसंतीच्या तीन पोलीस ठाण्यांचीसुद्धा नावे मागविण्यात आली होती. त्यानुसार ४०० च्या जवळपास पोलीस कर्मचाऱ्यांनी अर्ज केले होते. पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यापूर्वी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी पोलीस मुख्यालयात पोलीस वृंद परिषदेचे आयोजन करून पोलीस कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदलीबाबतच्या समस्या जाणून घेतल्या आणि पाहिजे तिथे बदली या संकल्पनेतून पोलीस स्टेशनच्या आवश्यकतेनुसार रिक्त जागांचा विचार करून पोलीस कर्मचाऱ्यांनी निवडलेल्या तीन ठिकाणांपैकी एका ठिकाणी १६२ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. पोलीस कर्मचाऱ्यांच्या मनाप्रमाणे त्यांनी दिलेल्या पसंतीच्या ठिकाणीच त्यांची बदली झाल्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढविण्यास मदत होईल. पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या कर्तव्यासोबतच कुटुंबास अधिक वेळ देता येईल, या दृष्टिकोनातूनच त्यांच्या विनंतीचा विचार करूनच बदली करण्यात आली. बदली केलेल्या कर्मचाऱ्यांच्या यादीमध्ये शहरातील ७१ पोलीस कर्मचारी आणि ग्रामीण पोलीस ठाण्यांमधील ९१ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.