अकोला: जिल्हास्तर शालेय कुस्ती स्पर्धेला यंदा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. जिल्हाभरातील १५0 नवोदित कुस्तीगीर स्पर्धेत सहभागी झाले होते. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन शुक्रवार २२ ऑगस्ट रोजी जुने शहर शिवाजी नगरातील संत गाडगेबाबा व्यायामशाळा येथे केले होते. स्पर्धेवर संत गाडगेबाबा व्यायामशाळेच्याच कुस्तीगीरांचा दबदबा राहिला. व्यायामशाळेच्या १९ कुस्तीगीरांची अमरावती विभागीयस्तर स्पर्धेसाठी निवड झाली. विविध वजनगटात योगेश माधवे, पंकज माधवे, प्रेम सोनी, राहुल हांडे, शुभम इंगळे, कार्तिक नागे, गणेश नागे, अविनाश घाटोळे, साहिल भारसाकळे, अमोल डामरे, सतीश खांदेल, हेमंत अनपत, कृष्णा मलिये, शंतनू मानतकर, तुषार गोतमारे, सुजित तेलगोटे, चिरंजीव ढवळे, ईश्वर चव्हाण यांनी विजय मिळविला. स्पर्धा १४,१७ व १९ वर्षाआतील मुले व १९ वर्षाआतील मुलींच्या गटात घेण्यात आली. अकोला, पातूर व बाळापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळप्रदर्शन केले. तत्पूर्वी, स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष विष्णू मेहरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र गोतमारे, सचिव सागर भिसे, रमेश मोहोकार, रूपलाल मलिये, बशीर खान, रामरतन धुर्वे, तपस्सू मानकीकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राज्य कुस्ती प्रशिक्षक लक्षमीशंकर यादव यांनी केले. स्पर्धेत पंच म्हणून महेंद्र मलिये, राजेश इंगळे, शिवा सिरसाट यांनी काम पाहिले.
कुस्ती स्पर्धेत १५0 कुस्तीगीरांचा सहभाग
By admin | Updated: August 24, 2014 00:52 IST