शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

मक्याच्या उत्पादनात १.५ टक्के वाढ अपेक्षित!

By admin | Updated: October 10, 2014 23:39 IST

खरीप मक्याला क्विंटलमागे १२00 रुपये दर मिळण्याची शक्यता.

अकोला- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केलेल्या सर्वेक्षणानुसार यावर्षी खरीप मक्याच्या उत्पादनात गतवर्षीच्या तुलनेत १.५ टक्के, म्हणजे सुमारे १.१३ कोटी टन मक्याचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. खरिपातील या मक्याला राज्यात ११00 ते १२00 रुपये प्रतिक्विंटल दर मिळण्याची श क्यता वर्तविली जात आहे. देशातील एकूण मका उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ९ टक्के आहे. तृणधान्य प्रकारात मोडणार्‍या मका या पिकाच्या उत्पादनात गत पाच वर्षांमध्ये जगभरात मोठी वाढ झाली आहे. जगभरातील मक्याच्या एकूण उत्पादनापैकी ७५ टक्के मका कुक्कुट खाद्य म्हणून वापरला जातो. २0 टक्के मक्याचा वापर स्टार्च उद्योगात आणि उर्वरित मका अल्कोहोल तयार करण्यासाठी वा परला जातो. २0१४ मध्ये जगभरात ९.८१ कोटी टन मक्याचे उत्पादन अपेक्षित आहे. २0१३ मध्ये ८.६८ कोटी टन उत्पादन झाले होते. यावर्षी १.५ टक्के म्हणजे १.१३ कोटी टन जास्त उत्पादन अ पेक्षित आहे. जगभरात ९.५0 कोटी टन मक्याची गरज आहे. देशातील एकूण मका उत्पादनापैकी सर्वाधिक २१ टक्के उत्पादन आंध्र प्रदेशात होते. त्यापाठोपाठ १६ टक्के कर्नाटक, १0 टक्के राजस्थान, ९ टक्के महाराष्ट्र आणि प्रत्येकी ६ टक्के मका उत्पादन उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात होते. मक्याच्या उत् पादनात यावर्षी जगभरात वाढ झाली असली, तरी यावर्षी अनियमित पावसामुळे भारतातून निर्यात होणार्‍या मक्याच्या टक्केवारीत घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पृष्ठभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभाग आणि कृषी विपणन केंद्राने धुळे येथील बाजारपेठेतील मागील २४ वर्षांच्या मासिक दराचे पृथ्थकरण करून काढलेल्या निकर्षानुसार ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात मक्याचे दर ११00 ते १२00 रुपये प्रतिक्विंटल राहतील, असा अंदाज वर्तविला आहे.