शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

‘डीसी रूल’चा अहवाल १५ दिवसांत शासनाकडे

By admin | Updated: June 16, 2016 02:10 IST

राज्यातून एक हजारांपेक्षा जास्त हरकती व सूचनांची नोंद.

आशिष गावंडे/अकोलाह्यडह्ण वर्ग महापालिकांसाठी विकास नियंत्रण नियमावली (डीसी रूल) लागू करण्यासाठी शासनाने डिसेंबर महिन्यात ह्यडीसी रूलह्णच्या मुद्दय़ावर अधिसूचना जारी केली. नागरिकांना हरकती व सूचना सादर करण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी देण्यात आला होता. नगर रचना व मूल्यनिर्धारण विभाग, पुणे कार्यालयाकडे राज्यातून एक हजारांपेक्षा जास्त हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. यासंदर्भातील अहवाल येत्या १५ दिवसांत शासनाकडे सादर केला जाईल. राज्यातील १४ ह्यडह्ण वर्ग महापालिका आणि ह्यअह्ण वर्ग नगरपालिकांमध्ये व्यावसायिक तसेच रहिवासी इमारतींच्या बांधकामासाठी केवळ एक चटई निर्देशांक (एफएसआय) मंजूर आहे. अपुर्‍या एफएसआयमुळे बांधकाम करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याने त्यामध्ये वाढ करण्याची मागणी व्यावसायिकांनी लावून धरली. बांधकाम व्यावसायिकांची मागणी लक्षात घेता, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सुधारित ह्यडीसी रूलह्णचा प्रस्ताव मंजूर करण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर महिन्यात ह्यडीसी रूलह्णसंदर्भात हरकती व सूचना मांडण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली. ३0 जानेवारीपर्यंत संबंधित विभागनिहाय सहसंचालक नगर रचना यांच्याकडे नागरिकांना हरकती व सूचना सादर करण्याचा अवधी देण्यात आला होता. नंतर हा कालावधी ४ फेब्रुवारीपर्यंत वाढवून देण्यात आला. ह्यडह्ण वर्ग मनपासाठी लागू केल्या जाणार्‍या ह्यडीसी रूलह्णसंदर्भात नगर रचना व मूल्यनिर्धारण विभाग, पुणे कार्यालयाकडे एक हजारांपेक्षा जास्त हरकती व सूचनांची नोंद झाली असून, याविषयी अहवाल येत्या १५ दिवसांत शासनाकडे सादर केला जाणार असल्याची माहिती आहे.अमरावती विभागातून ४९ हरकतीशासनाला एफएसआय, टीडीआर, प्रीमियम, हार्डशिप अँड कम्पाउंडिंग आदी विषयांवर वारंवार सूचना, निवेदन सादर करणार्‍या बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांनी मोठय़ा प्रमाणात हरकती व सूचना सादर करणे अपेक्षित होते. या ठिकाणी नेमका उलटा प्रकार घडल्याचे दिसून येते. अकोला आणि अमरावती शहरातून अवघ्या ४९ हरकती व सूचना सहसंचालक नगर रचना, अमरावती विभागाला प्राप्त झाल्या. यातही अकोला शहरातून केवळ २२ जणांनी हरकती व सूचना सादर केल्या.