शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

१२0 किलो ज्वलनशील कॅल्शियम कार्बाईड जप्त

By admin | Updated: September 13, 2014 01:19 IST

अकोल्यात दोन दुकानांवर एलसीबीचे छापे, दोघे गजाआड.

अकोला : स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सुभाष चौक व वाशिम स्टँड येथील दोन दुकानांवर छापे घालून दुकानांमध्ये विक्रीस असलेले १२0 किलो अत्यंत ज्वलनशील असलेले कॅल्शियम कार्बाईड जप्त केले. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली. शहरातील नागरी वस्तीमध्ये असलेल्या दुकानांमधून ज्वलनशील कॅल्शियम कार्बाईड पदार्थ विकल्या जात असल्याची माहिती एलसीबीचे पीएसआय ज्ञानेश्‍वर फड यांना मिळाली. त्यांनी शहरातील सुभाष चौकातील अब्बासअली शेख युसूफअली कपासी (५२) आणि वाशिम स्टँडवरील शरद मधुकरराव लगड (४0) यांच्या दुकानांवर छापा घातला. दुकानाची पाहणी केली असता, या दोघांनीही एका लोखंडी ड्रममध्ये कॅल्शियम कार्बाईड पदार्थ लपवून ठेवला होता. पोलिसांनी दोन्ही दुकानातील ड्रम जप्त केले. दोघाही विक्रेत्यांना अटक केली. ही कारवाई पोलिस हवालदार नरेंद्र चर्‍हाटे, जितेंद्र हरणे, मनोहर मोहोड, हसन शेख, संतोष चिंचोळकर, संतोष गवई यांनी केली. ** कशासाठी वापरले जाते कॅल्शियम कार्बाईडकॅल्शियम कार्बाईड हा पदार्थ अत्यंत ज्वलनशील आहे. या पदार्थाचा वापर गॅस वेल्डिंगसाठी, विविध प्रकारची कच्ची फळे पिकविण्यासाठी केला जातो. एवढेच नाहीतर कॅल्शियम कार्बाईड पदार्थामध्ये विविध प्रकारचे रासायनिक पदार्थ मिसळून त्याचा स्फोटक पदार्थ करण्यासाठीही वापर केला जातो. हा पदार्थ इमारतीमध्ये, विहिरींमध्ये स्फोट करण्यासाठीही वापरला जातो. पाण्यामुळे अधिक ज्वलनशील बनतो.  कॅल्शियम कार्बाईड पदार्थ हा विशेषकरून गॅस वेल्डिंगसाठी वापरात येतो. हवेच्या संपर्कात हा पदा र्थ आल्यास तो विरघळतो. कॅल्शियम कार्बाईडमध्ये आग लागल्यास आणि ती आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याचा वापर केल्यास, त्याचा विपरीत परिणाम दिसून येतो. पाण्याचा मारा केल्यानं तर आग आटोक्यात येण्याऐवजी अधिक भडकते, अशी माहिती पीएसआय ज्ञानेश्‍वर फड यांनी दिली.