शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

१२ तास भारनियमनाने गडंकी येथील ग्रामस्थ त्रस्त

By admin | Updated: July 10, 2014 01:28 IST

अकोला महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा

अकोला: दररोज बारा-बारा तास होत असलेल्या भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या गडंकी येथील नागरिकांनी बुधवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान महावितरणच्या गोरक्षण रोडवरील ग्रामीण कार्यालयावर मोर्चा काढला. गावकर्‍यांनी महावि तरणच्या कार्यालयाची दारे बंद करून अधिकारी, कर्मचार्‍यांना बाहेर जाऊ दिले नाही. गडंकीसह आजूबाजूच्या गावात दररोज बारा-बारा तास भारनियमन करण्यात येते. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रात्री विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यात अडचणी येत आहेत. सध्या ग्रामीण भागात ह्यबाईकर्स गँगह्णची दहशत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे संपूर्ण गावात अंधार असतो. त्यामुळे गावात चोर्‍याही वाढल्या आहेत. गावातील भारनियमन कमी करण्यासाठी कर्मचार्‍यांपासून तर अधिकार्‍यांना अनेक निवेदने देण्यात आली. मात्र त्याची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे नागरिकांनी बुधवारी सरळ कार्यालयावर धडक दिली. यावेळी कार्यालयात एकही अधिकारी हजर नव्हता. तर मोर्चेकर्‍यांनी अधिकार्‍यांशी संपर्क केला असता त्यांचे फोनही घेण्यात आले नाही.