शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

जप्त ११ हजार क्विंटल हरभरा, मुगाचा साठा मुक्त

By admin | Updated: December 4, 2015 02:59 IST

११ हजार ४३७ क्विंटल साठा विक्रीसाठी मुक्त करण्याचा जिल्हाधिका-यांचा आदेश.

अकोला: महिनाभरापूर्वी धाडसत्रात पुरवठा विभागाने जप्त केलेला ११ हजार ४३७ क्विंटल हरभरा डाळ, हरभरा व मुगाचा साठा शासन निर्णयाप्रमाणे विक्री करण्याच्या हमीपत्रावर विक्रीसाठी मुक्त करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी गुरुवारी दिला. गत २१ ऑक्टोबर रोजी पुरवठा विभागामार्फत राबविण्यात आलेल्या धाडसत्रात एमआयडीसीमधील गोयनका वेअर हाऊसमधील ओमप्रकाश डागा यांच्या ताब्यातील १ हजार ४९२ क्विंटल हरभरा डाळ, ५४५ क्विंटल हरभरा व ३३८ क्विंटल मूग असा एकूण २ हजार ३७५ क्विंटल साठा जप्त करण्यात आला होता. तसेच २४ ऑक्टोबर रोजी चांदूर शिवारातील पाटणी कोल्ड स्टोरेजमधून ९ हजार ६२ क्विंटल हरभरा साठा जप्त करण्यात आला होता. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांकडे संबंधित व्यापार्‍यांची सुनावणी घेण्यात आली. शासन निर्णयानुसार जप्त करण्यात आलेल्या हरभरा, हरभरा डाळ व मुगाची हमी दराने विक्री करणार असल्याबाबत संबंधित व्यापार्‍यांनी एक हजार रुपयांच्या हमीपत्रांवर लिहून दिल्यानंतर जप्त करण्यात आलेला एकूण ११ हजार ४३७ क्विंटल साठा विक्रीसाठी मुक्त करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी गुरुवार दिला.