शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

चार उमेदवारांचे ११ अर्ज वैध; एक अवैध!

By admin | Updated: December 11, 2015 02:50 IST

विधान परिषद निवडणूकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारांची छाननी प्रक्रिया.

अकोला: विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी गुरुवारी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात करण्यात आली. या छाननी प्रक्रियेत चार उमेदवारांचे ११ अर्ज वैध ठरले असून, एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज अवैध ठरविण्यात आला.अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २७ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २ डिसेंबरपासून सुरू झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, ९ डिसेंबर रोजी शिवसेना-भाजप युतीचे आमदार गोपीकिसन बाजोरिया, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे रवींद्र सपकाळ (बुलडाणा) यांच्यासह अपक्ष चंद्रकांत ठाकरे (मंगरुळपीर, जि. वाशिम), अपक्ष श्यामकुमार राठी (मलकापूर, जि. बुलडाणा) व अपक्ष संजय आठवले (आकोट, जि. अकोला) इत्यादी पाच उमेदवारांनी एकूण १२ अर्ज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे दाखल केले. या अर्जांची छाननी गुरुवार, १0 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली. त्यामध्ये चार उमेदवारांचे एकूण ११ अर्ज वैध ठरविण्यात आले असून, अपक्ष उमेदवार संजय आठवले यांनी दाखल केलेला एक उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला. छाननी प्रक्रियेला जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, तहसीलदार रामेश्‍वर पुरी यांच्यासह राजेंद्र नेरकर, दिनेश सोनाने, संतोष अग्रवाल उपस्थित होते.*अनामत रक्कम भरली नसल्याने संजय आठवलेंचा अर्ज अवैध!अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून अपक्ष म्हणून आकोटचे संजय आठवले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला; मात्र पाच हजार रुपये अनामत रकमेचा भरणा केला नाही. त्यामुळे गुरुवारी झालेल्या छाननी प्रक्रियेत त्यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला.वैध ठरलेले अर्ज उमेदवार                                    पक्ष                    अर्ज संख्याआ. गोपीकिसन बाजोरिया          शिवसेना                          0४रवींद्र सपकाळ                          राष्ट्रवादी काँग्रेस                0४चंद्रकांत ठाकरे                          अपक्ष                              0१श्यामकुमार राठी                       अपक्ष                              0२........................................एकूण                                                                            ११