शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

देशातील १00 जि.प. सर्कलमध्ये राबविणार रूर्बन मिशन

By admin | Updated: July 8, 2016 00:15 IST

केंद्राच्या रुर्बन मिशनमध्ये सुलतानपूर जि.प. सर्कलचा समावेश.

बुलडाणा : भारताच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामीण भागात सोईसुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे, केंद्र शासनाच्या राष्ट्रीय रु र्बन मिशन अंतर्गत सर्कलनिहाय आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात देशातील शंभर जिल्हा परिषद सर्कल निवडण्यात आले आहेत. खा. प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नांमुळे जिल्हय़ातील लोणार तालुक्यातील सुलतानपूर सर्कलचाही यात समावेश झाला आहे.केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाचे उच्च पदस्थ अधिकारी व राज्य शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या समन्वयाने यासाठी गावसमूहाचा आराखडा तयार करण्यासाठी सकारात्मक हालचाली प्रारंभ करण्यात आल्या आहेत. स्मार्ट खेड्यांसाठी २0२२ पर्यंतच्या सोईसुविधा अद्यावतीकरणाच्या अनुषंगाने राष्ट्रीय रुर्बन मिशन हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात देशातील शंभर जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणार्‍या खेड्यांचा यामध्ये समावेश आहे. यात सिरसाला जि. बिड, जोगेश्‍वर जि. औरंगाबाद, वडोदा जि. नागपूर, लोणीकाळभोर जि. पुणे, सुलतानपूर जि. बुलडाणा, आष्टी जि. जालना आणि मुक्ताईनगर जि.जळगाव असे राज्यातील सात सर्कल आहेत. खा. प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्र्यांकडे चर्चेदरम्यान मागणी केली होती. राज्यातील सातही सर्कलमध्ये एकात्मिक समूह कृती आराखडा तयार करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रत्येक सर्कलमध्ये २0२२ पर्यंत काय सुविधा पूर्ण करण्यात येईल. सांडपाणी व्यवस्थापन, पाणी पुरवठा, तीर्थक्षेत्र विकास, बाजारपेठ, रस्ते इतर मूलभूत सुविधा याबाबत अभ्यास करून, काय लागणार, किती निधी आवश्यक राहील याच्या अंतर्भावातून आराखडा तयार होणार आहे. स्मार्ट खेड्यांसाठी हा उपक्रम - खा.जाधवसुलतानपूरचा समावेश रुर्बन मिशनमध्ये झाल्याने जवळपास सर्कलमधील १२ खेड्यांचा भविष्याच्या दृष्टिकोनातून आराखडा तयार होईल. ग्रामपंचायतींनाच यासाठी निधी उभारावा लागणार असून, केंद्र शासनाकडून ३0 टक्के निधी मिळणार आहे. त्यामुळे एकत्रितरीत्या उपाययोजनांद्वारे स्मार्ट खेडीदेखील तयार होतील. राज्यातील ७ सर्कलमध्ये जिल्हय़ातील सर्कलचा समावेश झाल्याने आनंद असल्याची प्रतिक्रिया खा. प्रतापराव जाधव यांनी केली आहे.३0 टक्के रक्कम केंद्र देणार!ग्रामपंचायतीच्या १४ वा वित्त आयोग, आमदार-खासदार निधी, ग्रामपंचायत फंड असा जवळपास ७0 टक्के निधी या कामांसाठी सर्कलमधील खेड्यांना एकत्रितरीत्या संभाव्य विकास कामासाठी जमा करावा लागणार आहे. ३0 टक्के रक्कम केंद्र सरकारकडून दिली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे डी.आर.डी.ए. विभागाचे प्रमुख अनुप शेंगुलवार यांनी यासंदर्भात दिली आहे.