शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कारंजात १0 लाखाची घरफोडी

By admin | Updated: February 3, 2015 00:05 IST

एक संशयीत ताब्यात; व्हेंटीलेटरची जाळी तोडून चोरट्यांनी केला घरात प्रवेश.

कारंजा लाड (जि. वाशिम): येथील वर्दळीच्या मेमन जमात खान्यानजिकच्या एका घरात १0 लाखाची धाडसी चोरी झाल्याची घटना २ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ च्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी कारंजा पोलीसांनी रात्री श्‍वानपथकास पाचारण करून एका संशयीतास ताब्यात घेतले आहे. या घटनेत चोरट्यांनी रोख ३ लाख ५0 हजार रूपये व २५ तोळे सोने असा एकूण ९ लाख ५0 हजार रूपयाच्या ऐवजावर हात साफ केला आहे. प्राप्त माहितीनुसार, येथील मेमन जमात खाण्याजवळ राहणारे मो. फरहान हाजी मो. हारून आकबानी हे अडत व किराणा व्यवसायीक असून ते कामानिमित्त दररोज सकाळीच घराबाहेर पडतात. सोमवारला नित्यनेमाने ते घराबाहेर गेले. तसेच घरातील महिला सुद्धा खाजगी कामानिमित्त चालकासह स्वत:च्या चारचाकी वाहनाने अमरावती गेल्या होत्या. त्यामुळे घरी कुणीही नाही याची भनक चोरट्यांना लागली. दरम्यान या संधीचा फायदा उचलत चोरट्यांनी भरदिवसा दुपारी ३ वाजता सुमारास त्यांच्या घरात शिरुन धाडसी चोरी केली. चोरट्यांनी घरातील गच्चीवरील व्हेंटीलेटरची जाळी तोडून घरात प्रवेश केला व दरवाजा तोडून कपाटातील २५ तोळे सोने व ३ लाख ५0 हजार रुपये रोख असा ९ लाख ५0 हजार रूपयाचा ऐवज लंपास केला. मो. फरहान हे दुपारी ४ च्या सुमारास जेवणासाठी घरी आले असता त्यांना घरात चोरी झाल्यास निदर्शनास आले. त्यांनी घटनेची माहिती पोलीसांना देताच उपविभागीय पोलिस अधिकारी विलास देशमुख व ठाणेदार राजेश मुळे यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा केला. वृत्त लिहेपर्यंत पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल नव्हता. मात्र रात्री ७.३0 च्या सुमारास पोलीसांनी श्‍वानपथकास घटनास्थळावर पाचारण केले. श्‍वानपथकाच्या ईशार्‍यावर पोलीसांनी एक संशयीत युवकास चौकशीसाठी ताब्यात घेतले. संशयीत हा मो.फरहान यांचा नातेवाईक असल्याचे सांगीतले जात आहे.