शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शाळांसाठी १ लाख ६१ हजार पुस्तके!

By admin | Updated: May 15, 2017 02:08 IST

पुस्तके आली : शिक्षण विभागाने केली होती पहिली ते आठवीच्या पुस्तकांची मागणी

नितीन गव्हाळे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सर्व शिक्षा अभियान अंतर्गत अकोला जिल्ह्यातील प्राथमिक, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद शाळांसह अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांसाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिली ते आठवीच्या १ लाख ६0 हजार पुस्तकांची प्राथमिक शिक्षण विभागाने मागणी केली होती. त्यानुसार रविवारी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून जिल्ह्यातील शाळांसाठी १ लाख ६१ हजार ३५२ पुस्तके उपलब्ध करण्यात आली आहेत. रविवारी प्राथमिक शिक्षण परिषदेने पुण्यावरून ट्रकद्वारे अकोल्यातील सर्व शिक्षा अभियानाच्या कार्यालयाकडे पुस्तकांचा पुरवठा केला. रविवारी दुपारी ही पुस्तके उतरविण्यात आली. ‘सारे शिकूया, पुढे जाऊया’ हे ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱ्या सर्व शिक्षा अभियान अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्याची योजना अनेक वर्षांपासून राबविण्यात येते. यंदा प्राथमिक शिक्षण विभागाने बालभारती व महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण विभागाकडे पहिली ते आठवीच्या वर्गासाठी एकूण १ लाख ६0 हजार ९१५ पुस्तकांची मागणी केली होती. जिल्ह्यातील शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित राहू नये आणि शिक्षण घेताना अडचणी येऊ नयेत, शाळेतील सर्व मुलांची १00 टक्के उपस्थिती टिकून राहावी, विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने शासनाच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांसोबतच गणवेशसुद्धा देण्यात येतो. यंदा जिल्ह्यातील प्राथमिक, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद शाळांसह अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांना लवकरच शिक्षण विभागाच्या वतीने तालुकानिहाय पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. तालुकास्तरावर प्राप्त झालेली पाठ्यपुस्तके गटशिक्षणाधिकाऱ्यांना तालुकास्तरावरून केंद्र व शाळास्तरापर्यंत सर्व माध्यमांच्या शाळांना देण्यात येणार आहेत. उन्हाळी सुटी संपल्यानंतर शाळांमध्ये आयोजित समारंभांमधून ही पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात येतील. इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षण विभागाने १ लाख ६0 हजार पाठ्यपुस्तकांची मागणी केली होती. ही मागणी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने मंजूर करून सर्व शिक्षा अभियानांतर्गत १ लाख ६१ हजार पाठ्यपुस्तके पाठविली आहेत. पुस्तकांचे वितरण करण्यासंदर्भात लवकरच नियोजन करण्यात येईल. विलास धनाडे, उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद