जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी जिल्हा परिषदेत निदर्शने केली. तसेच दिवसभर राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी काळ्या फिती लावून कामकाज केले.कर्मचारी युनियनच्यावतीने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले की, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्याकडे राज्य सरकारचे नेहमीच दुर्लक्ष झालेले आहे. असे असतांना कर्मचाऱ्यांनी कधीच राज्य सरकार अथवा जनतेची अडचण होणार नाही, असे आंदोलन केले नाही. असे असतांना त्यांना न्याय मिळत नसल्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.राज्य सरकार जि.प. कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात अन्यायकारक भूमिका घेते. मात्र, संघटना संयम आणि सामजंस्य राखत आहे. आता सरकारचे डोळे उघडण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उगारण्यात आले असल्याचे विजय कोरडे यांनी सांगितले.आंदोलनात मुख्यालयातील सुमारे ५०० कर्मचारी सहभागी झाले. यावेळी राजू जरे, सुरेश वांढेकर, अशोक कदम, शशिकांत रासकर, संजय गोसावी, राहुल ठोकळ आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची निदर्शने
By admin | Updated: August 19, 2014 23:32 IST