शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आता ऑफलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:15 IST

अहमदनगर : येत्या १४ जून रोजी ॲानलाईन होणारी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा आता लाॅकडाऊन उठल्याने ॲाफलाईन होत आहे. त्यामुळे ...

अहमदनगर : येत्या १४ जून रोजी ॲानलाईन होणारी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा आता लाॅकडाऊन उठल्याने ॲाफलाईन होत आहे. त्यामुळे गेल्या सव्वा वर्षापासून सुरू असलेल्या ॲानलाईन सभेला ब्रेक लागणार आहे. ‌‌विविध विषयांवर चर्चा करता यावी, यासाठी सर्वसाधारण सभा ॲाफलाईनच घ्यावी, अशी मागणी सतत विरोधकांनी लावून धरली होती. अखेर आता जिल्हा प्रशासनानेच सभेला परवानगी दिल्याने प्रत्यक्ष सदस्यांच्या उपस्थितीत सभागृहात सभा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हा परिषद अधिनियमानुसार दर तीन महिन्यांनी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक आहे. या नियमानुसार येत्या २४ जूनला मागील सर्वसाधारण सभेचा तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे. त्यामुळे त्याआधी १४ जूनला जिल्हा परिषद प्रशासनाने सभा आयोजित केली होती. सभेबाबत प्रशासनाने २८ मे रोजी सदस्यांना लेखी कळवले. परंतु तेव्हा जिल्ह्यात लाॅकडाऊन असल्याने प्रशासनाने सभा ॲानलाईन आयोजित केली होती. त्याला विरोधी सदस्यांनी आक्षेप घेतला होता. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची वेळ येऊ नये म्हणून सत्ताधारी सतत ॲानलाईन सभा घेत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.

दरम्यान, आता जिल्हा परिषद प्रशासनाने १० जून रोजी पुन्हा सदस्यांना कळवून, ऑनलाईनऐवजी ऑफलाईन सभा होणार असल्याची माहिती दिली आहे. ६ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सभेला निर्बंध असणार नाहीत, असे म्हटले असल्याने १४ जून रोजी दुपारी १ वाजता होणारी सभा जिल्हा परिषद सभागृहात सर्व सदस्यांच्या उपस्थितीत त्याच वेळेत होईल, असे प्रशासनाने कळवले आहे. त्यामुळे आता गेल्या सव्वा वर्षानंतर सदस्यांना प्रत्यक्ष सभेला उपस्थित राहून चर्चा करता येणार आहे. अनेक सदस्यांनी या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले आहे.