कोपरगाव : नातलग महिलेस पळवून नेल्याचा राग आल्याने चाळीस वर्षीय इसमाचा हत्याराचे वार करून खून केल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी रात्री कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात खोपडी रस्त्यावर घडली़ या प्रकरणी मयताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे़घटनेबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, विलास दशरथ गायकवाड (वय ४०, रा़ खोपडी, ता़ कोपरगाव) याने सात वर्षांपूर्वी आरोपी काळू दगू सोनवणे (रा़ लौकी) याच्या नातलग महिलेस पळवून नेले होते़ त्याचा राग काळू सोनवणेच्या मनात खदखदत होता़ १९ सप्टेंबर रोजी रात्री धोत्रे शिवारातील खोपडी रस्त्यावर विलास गायकवाड हे काळू सोनवणे यास दिसले़ गायकवाड यांना अडवून काळूने हत्याराने वार करून त्यांना ठार मारले, अशा आशयाची तक्रार राजेश गोरक्षनाथ गायकवाड यांनी कोपरगाव पोलिसांना दिली़ या तक्रारीवरून पोलिसांनी काळू दगू सोनवणे याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ घटनास्थळी पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी भेट देऊन पंचनामा केला़ अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बी़ बी़ शिंदे करीत आहेत़ (प्रतिनिधी)
धोत्रे शिवारात रस्त्यात अडवून युवकाचा खून
By admin | Updated: September 20, 2014 23:21 IST