शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

कामरगाव येथे तरुणावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:21 IST

अहमदनगर : नगर तालुक्यातील कामरगाव येथे नऊ जणांनी तरुणावर प्राणघातक हल्ला करून त्याला जखमी केले. २६ मार्च रोजी सकाळी ...

अहमदनगर : नगर तालुक्यातील कामरगाव येथे नऊ जणांनी तरुणावर प्राणघातक हल्ला करून त्याला जखमी केले. २६ मार्च रोजी सकाळी आठ वाजता ही घटना घडली. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात हल्ल्यात जखमी झालेला जितेंद्र वत्र्याप भोसले याने फिर्याद दिली असून, पोलिसांनी शशिकांत सीताराम भोसले, रमेश सीताराम भोसले, गोरख चव्हाण, सागर भोसले, सोनाली भोसले, कुरूना भोसले, पानतास भोसले, वत्र्याप भोसले (सर्व रा.कामरगाव ता.नगर) आदिम विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक रितेश राऊत हे पुढील तपास करत आहेत.

...........

लिफ्ट देणारेच निघाले लुटारू

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील सुपा येथून श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथे जाणाऱ्या दोघा तरुणाला एका कार चालकाने लिफ्ट दिली. प्रत्यक्षात त्या कारमध्ये बसलेले लुटारू निघाले. लुटारूंनी जबरदस्तीने या दोघा तरुणांना निंबळक परिसरात आणून शस्त्रांचा धाक दाखवून, त्यांना मारहाण करत, त्यांच्याकडील १२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हिसकावून नेला. २७ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सत्यम कैलास घोडके (वय २०, रा.मांडवगण) याने दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक कणसे हे पुढील तपास करीत आहेत.

.........

दुकान फोडून पैसे, किराणा चोरला

अहमदनगर : कर्जत येथे चोरट्यांनी किराणा दुकान फोडून रोख रक्कम व किराणामाल असा एकूण ११ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. २७ ते २८ मार्चदरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात अविनाश संजय राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहायक फौजदार गाडे हे पुढील तपास करत आहेत.

...............

महिलेस रॉडने मारहाण करून दागिने ओरबाडले

अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे चोरट्यांनी घरात घुसून महिलेला लोखंडी रॉडने मारहाण करून, तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व घरातील रोख रक्कम असे एकूण १६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. २९ मार्च रोजी ही घटना घडली. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात सतीश रायभान बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक बोराडे हे पुढील तपास करत आहेत.

...........

घरफोडी करून दागिने चोरले

अहमदनगर : शेवगाव शहरातील खंडोबानगर येथे चोरट्यांनी घरफोडी करून १५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. २९ मार्च रोजी ही घटना घडली. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात ज्ञानदेव यादव आगलावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक दराडे हे पुढील तपास करत आहेत.

..........

शेतातून दोन लाखांची माती चोरली

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील पळवे बु. येथील शेतातून एकाने तब्बल २ लाख रुपयांची २०० ब्रास माती चोरून नेली. २५ ते २८ मार्चदरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी साहेबराव वनाजी ठबे यांनी २९ मार्च रोजी सुपा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रणजीत दत्तात्रय दिवटे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहायक फौजदार साबळे हे पुढील तपास करत आहेत.

...........

कार्यालय फोडून चोरी

अहमदनगर : सुपा एमआयडीसी येथील एस.एस. एंटरप्राइजेस या कंपनीचे कार्यालय फोडून चोरट्यांनी वजनकाटा, लॅपटॉप व कॉम्प्यूटर असा एकूण ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी २८ मार्च रोजी सुपा पोलीस ठाण्यात दिग्विजय माधवराव शितोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल चौधरी हे पुढील तपास करत आहेत.