शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

शहर बँक अपहारातील आरोपी योगेश मालपाणी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:15 IST

नगर शहरात उभारण्यात आलेल्या एम्स हॉस्पिटलमध्ये मशिनिरी खरेदीसाठी डॉ. नीलेश शेळके याने बँकेच्या संचालक मंडळाशी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या ...

नगर शहरात उभारण्यात आलेल्या एम्स हॉस्पिटलमध्ये मशिनिरी खरेदीसाठी डॉ. नीलेश शेळके याने बँकेच्या संचालक मंडळाशी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर कर्ज मंजूर करून आर्थिक फसवणूक केली, अशा प्रकारची फिर्याद राहुरी येथील डॉ. रोहिणी भास्कर सिनारे, श्रीरामपूर येथील डॉ. उज्ज्वला रवींद्र कवडे व नगरमधील डॉ. विनोद अण्णासाहेब श्रीखंडे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात सप्टेंबर २०१८ मध्ये दाखल केली होती. या तिघांची प्रत्येकी ५ कोटी ७५ लाख रुपयांची फसवणूक झाली होती. त्यानुसार डॉ. शळके याच्यासह बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी व मशिनरी वितरक योगेश मालपाणी आदींविरोधात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे या प्रकरणाचा तपास करत आहेत. मालपाणी याच्याकडून हॉस्पिटलसाठी मशिनिरी घेतल्या जाणार होत्या. यासाठी बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर त्याला पैसे वर्ग करण्यात आले होते. मालपाणी याने मात्र मशिनरी न देता हे पैसे बनावट खात्यात वर्ग केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. अपहारातील सहभाग समोर आल्याने पोलिसांनी मालपाणी याला बुधवारी नगर शहरातील त्याच्या राहत्या घरातून अटक केली.

-----------------------

फॉरेन्सिक ऑडिटचा अहवाल आठ दिवसांत

या गुन्ह्याचे दीड वर्षापासून फॉरेन्सिक ऑडिट सुरू आहे. येत्या आठवडाभरात हा अहवाल प्राप्त होणार असल्याचे तपासी अधिकारी सोनवणे यांनी सांगितले. या अहवालात अपहार कसा झाला आणि त्यात कुणाचा सहभाग होता हे स्पष्ट होणार असल्याने येत्या काही दिवसांत आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या गुन्ह्यात आधी अटक केलेला डॉ. नीलेश शेळके याच्याविरोधात मागील महिन्यात जिल्हा न्यायालयात तीन स्वतंत्र दोषारोपत्र दाखल करण्यात आलेले आहेत.