तळेगाव दिघे विद्यालयात आयोजित महिला दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एच. आर. दिघे होते. यानिमित्ताने शिक्षिका अश्विनी बिऱ्हाडे, शालन उगले, शोभा गुंजाळ, प्रमिला घायतडकर, शीतल कडलग, धनश्री दिघे, अश्विनी कुऱ्हाडे, आशा पन्हाळकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्राचार्य एच. आर. दिघे यांनी महिला दिनानिमित्ताने शिक्षिकांना शुभेच्छा दिल्या. प्रसंगी पर्यवेक्षक संजय दिघे, बी. सी. दिघे, तुकाराम सोळसे, मच्छिंद्र सोनवणे, सुनील थेटे, बाबा जगताप, मच्छिंद्र सोळसे, सुनील दिघे, गोरख दिघे, संदीप देशमुख, संजय सानप, रामनाथ कोल्हे, भाऊसाहेब दिघे उपस्थित होते. सूत्रसंचालन तुकाराम सोळसे यांनी केले. सुनील दिघे यांनी आभार मानले.
फोटो : ०९नारी गौरव
तळेगाव दिघे : येथील विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करीत महिला दिनानिमित्त नारी शक्तीचा गौरव करण्यात आला.