शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेवर महिलांचा हल्लाबोल

By admin | Updated: August 30, 2014 23:21 IST

संतप्त महिला व युवकांनी शनिवारी (दि़३०) दुपारी नगरपालिकेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या कक्षाची मोडतोड केली़

कोपरगाव : शहरातील मोहनीराजनगर भागाला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन गोदावरी नदीला आलेल्या पुरात दीड महिन्यापूर्वी वाहून गेली़ परंतु अद्यापही पाईपलाईन दुरुस्ती करण्यात आली नाही़ तसेच टँकरद्वारे पाणी वाटपात अन्याय केला जात असल्यामुळे संतप्त महिला व युवकांनी शनिवारी (दि़३०) दुपारी नगरपालिकेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या कक्षाची मोडतोड केली़कोपरगाव नगरपालिकेचा मोहनीराजनगर, बेट भागास पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन मध्यंतरी गोदावरी नदीस आलेल्या पुरात वाहून गेली. त्यास दीड ते दोन महिने उलटले आहेत़ मात्र, अद्यापही नगरपालिका प्रशासनाने पाईपलाईनची दुरुस्ती केली नाही़ बेट, मोहनीराजनगर भागास टँकरने पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठ्यात पक्षपातीपणा केला जात असल्याचा आरोप करुन महिला व युवकांनी शनिवारी पालिकेत आंदोलन केले़ बापू काकडे, काळू आल्हाट, गणेश काकडे, बाळासाहेब नवघरे आदी शिवसेना व मनसेच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी पालिकेवर हंडा मोर्चा आणला. यावेळी मुख्याधिकारी हजर नव्हते. कार्यालयीन अधिक्षक तांबट व अन्य कर्मचारी होते. महिलांनी घोषणाबाजी व रिकामे हंडे वाजवून सत्ताधाऱ्यांचा निषेध केला़ महिलांनी त्याच हंड्यांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या दालनाच्या खिडकी, दरवाजाच्या काचा फोडल्या. मुख्याधिकाऱ्यांची कक्षाची तसेच कर्मचाऱ्यांच्या टेबल, खुर्च्यांची मोडतोड केली़ कपाटे फोडून आतील कागदपत्रे फेकून दिली. नगरपालिकेत या महिलांकडून तोडफोड चालू असल्याचे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांना समजल्यानंतर राजेंद्र झावरे, भरत मोरे, प्रशांत कडू, अशोक लकारे यांच्यासह ते पालिकेत आले़ नगराध्यक्षांच्या दालनात संजय सातभाई यांना महिलांना धारेवर धरले. आमच्या भागास टँकर का नाही, नगरपालकेचा पाणीपुरवठा दोन महिन्यापासून बंद आहे. पाईपलाईन कधी दुरुस्त होणार, नगरपालिकेचे मोहनीराजभागाकडे अजिबात लक्ष नाही. पाण्याचा प्रश्न एवढा गंभीर असताना कर्मचारी, पदाधिकारी काय करतात, नगरपालिकेस मोहनीराजनगर भागाला न्याय देता येत नसेल तर आम्हाला ग्रामीण भागात टाका मग आम्ही आमचा विकास करतो, आम्हाला नगरपालिकेची गरज नाही, अशा शब्दात महिलांनी सातभाई यांना धारेवर धरले़ (प्रतिनिधी)