रियाज सय्यद, संगमनेरलोकसभेचा वारू थंडावत नाही, तोच विधानसभेची तयारी सुरू झाली आहे. तीन मतदारसंघात विभागलेल्या संगमनेर विधानसभेला प्रस्थापितांची स्थिती मजबूत दिसत असली तरी लोकसभेच्या निमित्ताने विरोधी मतांचा वाढलेला टक्का मताधिक्य घटवू शकतो. संगमनेर विधानसभा मतदार संघातील १११ गावांमध्ये एकूण २ लाख ४८ हजार ६८५ मतदार आहेत. तालुका संगमनेर, शिर्डी व अकोले अशा तीन विधानसभा मतदारसंघांत विभागला आहे. संगमनेरला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (काँग्रेस), शिर्डीला कृषिमंत्री राधाकृष्ण विखे (काँग्रेस) व अकोलेत आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड (राष्ट्रवादी) हे प्रतिनिधीत्व करतात. हा मतदारसंघ पूर्वी कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला होता. १९८४ साली थोरातांनी अपक्ष आमदारकी मिळविली. तेव्हापासून आजतागायत मतदारसंघावर काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व आहे. १९९९ साली पाटबंधारे खात्याचे राज्यमंत्री झालेल्या थोरातांच्या रूपाने तालुक्याला प्रथमत: संधी मिळाली. पुढे कृषी, शालेय शिक्षण, जलसंधारण, रोहयो, राजशिष्टाचार आणि महसूल अशा महत्वपूर्ण खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळत राज्याच्या राजकारणातही दबदबा निर्माण केला. मंत्रिपदाचा पुरेपूर फायदा तालुक्याच्या हितासाठी करून घेतला. निळवंडे धरण, २ हजार शेततळ्यांची निर्मिती, उपग्रहाद्वारे जमीन मोजणी, माती परीक्षण, फाईव्ह-एस प्रणाली, राजस्व अभियान, गतीमान व लोकाभिमुख प्रशासन, आॅनलाईन सातबारा, शीव व पाणंध रस्ते मोकळे करणे, संगणकीय कामकाज, ई-टेंडर, घरपोहच दाखले आदी त्यांच्या जमेच्या बाजू ठरतात.विरोधी शिवसेना-भाजप युतीच्या काळात हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. संभाजीराजे थोरात, दिलीप शिंदे, अॅड. बापूसाहेब गुळवे, बाबासाहेब कुटे आदींनी थोरातांविरूध्द नशीब आजमावले. पण, शिवसेनेला यश आले नाही. तरी देखील विरोधी मते वाढतच गेली. एकहाती सत्ता असलेल्या थोरातांना मागील वेळी मोठे मताधिक्य मिळाले. त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत गेले. परंतु यंदाच्या लोकसभा निवडणूक निकालाने सर्वांना मोठा हादरा दिला. संगमनेरकरांनी महायुतीला मताधिक्य देवून सत्ताधाऱ्यांना विचार करायला भाग पाडले. याचा बोध घेवून विधानसभेची तयारी सुरू झाली आहे. काँग्रेसकडून थोरात हे उमेदवार आहेत. विरोधी मतांचा फायदा उठविण्याच्या दृष्टीने महायुतीमध्ये मतदारसंघ बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सेनेच्या अपयशामुळे हा मतदारसंघ भाजपने घ्यावा, असा एक मतप्रवाह महायुतीत आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. उमेदवार कोण असेल? याबाबत संदिग्धता असली तरी प्रा. एस. झेड. देशमुख व अॅड. श्रीराम गणपुले यांची नावे चर्चेत आहेत. अर्थात उमेदवार कुणीही असला तरी त्यांना थोरातांशी मुकाबला करावा लागणार आहे. काँग्रेसबाळासाहेब थोरात९६६८६शिवसेनाबाबासाहेब कुटे४१३१०सजपाअॅड. निशा शिऊरकर४२२७इच्छुकांचे नावपक्षबाळासाहेब थोरातकाँग्रेसश्रीराम गणपुलेशिवसेनाप्रा. एस. झेड. देशमुखशिवसेनाशरद नाना थोरात स्वाभिमानी मंडळलोकसभा निवडणुकीत सदाशिव लोखंडे यांना २६ हजारांचे मताधिक्य
विरोधी टक्का मताधिक्य घटविणार?
By admin | Updated: June 14, 2014 01:19 IST