शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा गळा दाबून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 19:22 IST

दररोज भांडत असल्याचा राग धरून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुलाखाली टाकून देण्यात आला होता.

आॅनलाईन लोकमतश्रीगोंदा (अहमदनगर), दि़ १४ - दररोज भांडत असल्याचा राग धरून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुलाखाली टाकून देण्यात आला होता. श्रीगोंदा तालुक्यातील चिखली शिवारात ९ मे रोजी ही घटना घडली. पोलीस सूत्रांची माहिती अशी की, कैलास आनंद नरके व पत्नी सविता (रा. नरके वाडी तळेगाव ढमढेरे, ता.शिरूर,जि. पुणे) या दाम्पत्यामध्ये वारंवार भांडणे होत असत. कैलास ट्रकवर चालक होता. यवत (ता. दौंड) येथील एका मसालेच्या कंपनीत नोकरीला होता. ९ मे रोजी अकोला येथील एका व्यापाऱ्याचा मसाला त्याने ट्रकमध्ये भरला आणि तळेगावला पत्नी सविताला मसाला नेण्यासाठी बोलावले. तिला ट्रकमध्ये बसवून शिरूर, कोळगाव मार्गे चिखलीला आणून तिचा गळा दाबून खून केला. खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी सविताचा मृतदेह पुलाखाली फेकून दिला. या संदर्भात बेलवंडी पोलीस ठाण्यात १२ मे रोजी महिलेचा मृतदेह सापडल्याचा गुन्हा दाखल झाला होता. बेलवंडी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन वागंडे यांनी पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा ३६ तासात तपास लावला. यासाठी पोलीस राहुल मोढळे, आबासाहेब झावरे, कैलास देशमुख यांनी विशेष मदत केली. आरोपी कैलास नरके याने पत्नीच्या खुनाची कबुली दिली. पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन वांगडे करीत आहेत. पैंजणीमुळे लागला छडा सविताच्या पायात चांदीची जोडवी, पैंजण होते. पैंजणवर ‘बीएमएमएन ९११’ असा मार्क होता. अशा मार्कचे दागिने शिरूर, शिक्रापूर परिसरातील सोनार विकतात याची माहिती पोलिसांना मिळाली. शिक्रापूर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याचे काही गुन्हे दाखलआहेत का याची शहानिशा बेलवंडी पोलिसांनी केली. तेव्हा सविता नरके ९ मे पासून बेपत्ताअसल्याचे समजले. पोेलिसांनी हे पैंजण सविताच्या मुलींना दाखविले असता त्यांनी हंबरडा फोडला. कैलास नरकेकडे पोलिसांनी चौकशी केली असता सुरूवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु नंतर त्याने पत्नीच्या खुनाची कबुली दिली.