अहमदनगर : शहरातील वाडिया पार्क आणि मोकळी मैदाने खुली करण्याची मागणी जिल्हा क्रीडाधिकारी यांच्याकडे केली होती. ती त्यांनी मान्य केली असून, जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या निर्णयाचे मातोश्री प्रतिष्ठाणचे अध्यक्ष दीपक कावळे यांनी स्वागत केले आहे.
याबाबत दिलेल्या पत्रकात कावळे यांनी म्हटले आहे की, गत आठवड्यात जिल्हा क्रीडाधिकारी शेखर पाटील यांच्याकडे निवेदन देऊन वाडिया पार्क, तसेच शहरातील मैदाने खुली करण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने
बुधवारपासून वाडिया पार्क खुले करण्यात आले आहे. सामाजिक व वैयक्तिक अंतराच्या नियमांचे पालन करीत वाडिया पार्क नागरिकांसाठी खुले असणार आहे. कोणत्याही सामुदायिक उपक्रमांना मात्र परवानगी दिलेली नाही. बुधवार (दि. १६) पासून सकाळी ६ ते सकाळी ९ व दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार असून, क्रीडा संकुल समितीने निश्चित केलेले शुल्क अदा केल्यानंतरच प्रवेश मिळणार असल्याचे जिल्हा क्रीडाधिकारी यांनी सांगितले, असे कावळे यांनी पत्रकात म्हटले आहे.