शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
6
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
7
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
8
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
9
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
10
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
11
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
12
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
13
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
14
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
15
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
16
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
17
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
18
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
19
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
20
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश

श्रीरामपुरात पाणी कपात

By admin | Updated: June 28, 2014 01:11 IST

श्रीरामपूर: जलसंपदा विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसून श्रीरामपूर तालुक्यात पाणी टंचाई सुरू झाली आहे.

श्रीरामपूर: जलसंपदा विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसून श्रीरामपूर तालुक्यात पाणी टंचाई सुरू झाली आहे.निळवंडे धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडले होते. पण जलसंपदा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे तसेच कालवा सल्लागार समितीच्या नियंत्रणाअभावी हे पाणी वरच्याच भागात गायब झाले. या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींविरूद्ध कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सचिन गुजर यांनी केली आहे. श्रीरामपूर नगरपालिकेचे दोन साठवण तलाव आहेत. प्रवरा डाव्या कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाचे पाणी कालव्याच्या अकराशे क्युसेस या पूर्ण क्षमतेने नॉर्दन ब्रँचपर्यंत आल्यास ३ दिवसात म्हणजे ७२ तासात श्रीरामपूरचे साठवण तलाव भरतात. त्यातून ४५ दिवस पुरेल एवढा पाणी साठा होतो. पण यावेळी जेमतेम २५ तासच पाणी मिळाले. तेही ८० क्युसेसने मिळाले. पूर्वीचा ४ दिवस पुरेल एवढा पाणी साठा शिल्लक होता. त्यामुळे श्रीरामपूर नगरपालिकेस फक्त १२ दिवस पुरेल एवढाच पाणी साठा आहे. आणखी ४६ तास पाणी मिळाले असते तर ५ आॅगस्टपर्यंत पुरेल, एवढा पाणी साठा साठवण तलावात झाला असता, असे श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी सांगितले.(प्रतिनिधी)