शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

कचरा वेचकांचा समावेश घनकचरा व्यवस्थापनात करावा

By | Updated: December 5, 2020 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : शहरातील कागद, काच, पत्रा गोळा करणाऱ्या असंघटित कामगारांचा समावेश घनकचरा व्यवस्थापनात करावा, अशी मागणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : शहरातील कागद, काच, पत्रा गोळा करणाऱ्या असंघटित कामगारांचा समावेश घनकचरा व्यवस्थापनात करावा, अशी मागणी विकास उडाणशिवे यांनी केली आहे.

महापालिकेत स्वच्छ भारत प्लास्टिक निर्मूलन कार्यक्रम बुधवारी झाला. या कार्यक्रमात शहरातील असंघटित कचरावेचक सहभागी झाले होते. यावेळी कचरावेचक ज्योती शिंदे, शीतल शिंदे, मीना चांदणे, वनिता घोरपडे, लक्ष्मी भालेकर, मंगल घोरपडे, दीपाली घोरपडे, रेखा साळवे, संगीता गाडे, मालन वाघमारे, शोभा बोरडे, सुशीला रणदिवे, दीपाली कांबळे, गयाबाई चांदणे, सुभद्रा साळवे आदींची उपस्थिती होती. यावेळी संघटनेच्या कामगारांना ओळखपत्र देण्यात आले, तसेच १८० सभासदांना कौशल्य भारत विकास योजनेंतर्गत ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करणे, तसेच आरोग्यासंबंधित प्राथमिक माहिती देऊन ३ वर्षांचे अपघात विमा संरक्षण शासनामार्फत देण्यात आले आहे. कार्यक्रमानंतर उडाणशिवे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कागद, काच, पत्रा, कष्टकरी पंचायत गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याने कचरा गोळा करणाऱ्या कामगारांसाठी त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याचे काम करीत आहे. सध्या कचरावेचकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक जिल्ह्यांत कचरावेचकांचा घनकचरा व्यवस्थापनामध्ये समावेश करून घेण्यात आला आहे. त्याचा आधार घेत मनपानेही येथील काच, कचरावेचकांचा समावेश करून घ्यावा, अशी आमची मागणी असल्याचे विकास उडाणशिवे यांनी सांगितले.