शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आखेगावच्या उपसरपंचपदी वृंदावनी डोंगरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:19 IST

शेवगाव : तालुक्यातील आखेगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत वृंदावनी दादासाहेब डोंगरे या एकमताने विजयी झाल्या. उपसरपंच शिवाजी नाचण यांनी ...

शेवगाव : तालुक्यातील आखेगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत वृंदावनी दादासाहेब डोंगरे या एकमताने विजयी झाल्या.

उपसरपंच शिवाजी नाचण यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक घेण्यात आली होती.

यावेळी वृंदावनी डोंगरे यांना व त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार मनोहर काटे यांना समान प्रत्येकी पाच मते पडली. यावेळी सरपंच बाबासाहेब गोर्डे यांनी मतदानाचा हक्क बजावत डोंगरे यांच्या पारड्यात मत टाकल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. निवडणूक अधिकारी म्हणून बाबासाहेब गोर्डे यांनी विजयी झाल्याची घोषणा केली. सहायक निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक संतोष कातकडे यांनी काम पाहिले. त्यांना फलकेवाडीचे ग्रामसेवक अविनाश म्हस्के यांनी सहकार्य केले.

आखेगाव ग्रामपंचायतीत १२ सदस्य संख्या असून त्यापैकी एक जण गैरहजर राहिल्याने ११ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान एका सदस्याने मत पत्रिकेवर शिक्का न मारल्याने ‘ती’ मतपत्रिका बाद ठरवण्यात आली. यावेळी ग्रामसेवक संतोष कातकडे, लिपिक रामदास पायघन, ग्रामपंचायत सदस्य शंकर काटे, अंबिका खर्चन, मुक्ताबाई नाचण, गंगूबाई मराठे, शीतल नाचण, अमोल ससाणे, भाऊसाहेब पायघन आदी उपस्थित होते. विद्या ससाणे या बाहेरगावी असल्याने गैरहजर होत्या. वृंदावनी डोंगरे या पत्रकार दादासाहेब डोंगरे यांच्या पत्नी आहेत.

फोटो : २१ वृंदावनी डोंगरे