शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

गुंडगिरी विरूध्द राहुरीत विराट मोर्चा

By admin | Updated: August 20, 2016 01:04 IST

राहुरी : राहुरी शहर व तालुक्यात गुंडगिरी करणारांनी सर्वसामान्यांचे जीणे मुश्कील केले आहे़ बिहार सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने वैतागलेल्या नागरिकांनी शुक्रवारी विराट मोर्चा काढला़

राहुरी : राहुरी शहर व तालुक्यात गुंडगिरी करणारांनी सर्वसामान्यांचे जीणे मुश्कील केले आहे़ बिहार सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने वैतागलेल्या नागरिकांनी शुक्रवारी विराट मोर्चा काढला़ कुठलेही आवाहन न करता, व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त बंद पाळला व मोर्चेकऱ्यांना पाठींबा दर्शविला़ शेतकरी अपहरण प्रकरणातील आरोपीला अटक करण्याचे आश्वासन व अवैध व्यवसाय बंद करण्याचे संकेत दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले़राहुरी येथील बालाजी मंदिरासमोर असलेल्या प्रांगणात मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय जमा झाल्याने नगर-मनमाड मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली़ हातात फलक व भगवे ध्वज घेऊन विराट मोर्चा राहुरी शहरातून काढण्यात आला़ गुंड प्रवृत्तीविरूध्द घोषणा देत मोर्चा राहुरी तहसील कचेरीवर धडकला़मोर्चाचे रूपांतर सभेत झाले़ तहसील समोर असलेले प्रांगण कमी पडल्याने मोर्चेकऱ्यांनी झाडावर व वाहनांच्या टपावर बसून भाषणे ऐकली़ गुंड प्रवृत्तीवर वक्त्यांनी घणाघाती टीका केली़ प्रास्ताविकात राजू शेटे यांनी संभाजी उगले अपहरण प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करावी, बारागाव नांदूर येथील गुंडांचा बंदोबस्त करावा, वाळू उचलेगिरी, मटका यांचा बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला़शिवप्रहार संघटनेचे संस्थापक संजीव भोर यांनी खोट्या अ‍ॅट्रॉसीटी दाखल करू नयेत अन्यथा सर्व गावकरी एकीने प्रतिकार करतील, असा इशारा दिला़ मुळा नदी पात्रात असलेला पूल उघडा पडल्याबद्दल संभाजी तनपुरे यांनी टीका केली़मोर्चेकऱ्यांना सिंधुबाई पवार, प्रतिभा जऱ्हाट, देवेंद्र लांबे, कृषिराज टकले, रवींद्र मोरे, प्रकाश देठे, मच्छिंद्र डोळकर, बाळासाहेब पवार आदींनी मार्गदर्शन केले़ उपविभागीय अधिकारी पी़ एम़ बावीस्कर यांना निवेदन देण्यात आले़मोर्चामध्ये विचारलेल्या प्रश्नांना तहसीलदार अनिल दौंडे व पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी उत्तरे दिली़ वाळू उचलेगिरीविरूध्द मोहीम हाती घेण्यात आली असून गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन तहसीलदार दौंडे यांनी दिले़ आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे आश्वासन पोलीस निरीक्षक वाघ यांनी दिले़ दारू, वाळू तस्करी व मटक्याचा बंदोबस्त केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली़(तालुका प्रतिनिधी)राहुरीत मोर्चेकऱ्यांचा उच्चांकऊस झोन प्रश्नी ३२ वर्षापूर्वी राहुरी येथे मोर्चात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते़ त्यागर्दीचा उच्चांक शुक्रवारच्या मोर्चाने मोडून काढला़ हा विषय तालुक्यात चर्चेचा ठरला़ जागा कमी पडल्याने मिळेल तेथे बसून नागरिक भाषणे ऐकत होते़