तळेगाव दिघे : जीवनात पाणी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. पाणी असेल तर ग्रामीण भागासह शहरी भागात समृद्धी निर्माण होते. पाणी बचत, हीच पाणी निर्मिती असून जलसंवर्धन व संधारण होणे अत्यंत गरजेचे आहे. लोकसहभागातून जलसंवर्धन झाल्यास गावे समृद्ध होतील, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द येथे क्रॉम्प्टन ग्रीव्हज सीएसआर फंड, वनराई संस्था, जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून पाणलोट क्षेत्र विकासाच्या कार्यक्रमाचे भूमिपूजन सोमवारी महसूलमंत्री थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वनराई संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धारिया, आमदार डॉ. सुधीर तांबे, वनराई संस्थेचे सचिव अमित वाडेकर, प्रकल्प संचालक जयवंत देशमुख, आकाश शिंदे, अॅड. अजित वाडेकर, चंद्रकांत चव्हाण, थोरात साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे, अजय फटांगरे, बी. आर. चकोर, सुभाष सांगळे, बाबासाहेब कांदळकर, सचिन दिघे, अॅड. सुहास आहेर उपस्थित होते.
भविष्यात पाण्यासाठी अडचण होऊ नये म्हणून पाणी स्वावलंबनासाठी जलसंधारण अत्यंत महत्त्वाचे आहे. गावातले पाणी गावात जिरवा, गट तट विसरून गावच्या विकासासाठी एकत्र या, असे आवाहनही मंत्री थोरात यांनी केेले.
सूत्रसंचालन प्रा. बाबा खरात यांनी केले. सखाराम शरमाळे यांनी आभार मानले.
..
फोटो : २३ बाळासाहेब थोरात जलसंधारण पाहणी
...
पारेगाव खुर्द येथे पाणलोट क्षेत्र विकास कामाची पाहणी करताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात. समवेत पदाधिकारी.