पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी साईलता सामलेटी, शिक्षण विस्तार अधिकारी सुवर्णा फटांगरे, केंद्रप्रमुख दशरथ धादवड, निमज गावचे सरपंच गोरक्ष डोंगरे यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका वडनेरे, उपमुख्याध्यापिका वैशाली कानवडे यांच्या कामाचे विशेष कौतुक केले. शाळेच्या भितींवर चित्रे रेखाटणारे दीपक भालेराव यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी निमज ग्रामपंचायतीने आरो मशीन दिले आहे. संगमनेर पंचायत समितीच्या माजी सभापती निशा कोकणे यांच्या निधीतून २५ हजार रुपये शाळेला देण्यात आले.
प्रास्ताविक मुख्याध्यापिका वडनेरे यांनी केले. सूत्रसंचालन गोडसेवाडी शाळेतील शिक्षक श्रीकांत बिडवे यांनी केले. उपमुख्याध्यापिका कानवडे यांनी आभार मानले. ग्रामपंचायत सदस्य अरुण गुंजाळ, निमज शाळेचे मुख्याध्यापक अरुण जाधव, खांडगाव शाळेतील शिक्षक अशोक शेटे, ग्रामसेवक आर. एम. मालुंजकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा उषा गुंजाळ, उपाध्यक्ष योगीता गुंजाळ, शांताराम गुंजाळ, रामनाथ गुंजाळ, वीरभद्र रावसाहेब गुंजाळ, दशरथ गुंजाळ, अनिल मतकर, वसंत मतकर, मंगेश मतकर आदी यावेळी उपस्थित होते.