राहुरी तालुक्यातील पूर्वभागत दळणवळणाच्या अत्यंत महत्त्वपूर्ण समजला जाणारा आरडगाव ते केंदळ रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमण झाल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे मोठे मुश्कील झाले आहे. प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. केंदळ-मानोरी रस्त्यावरील मध्यंतरी झालेल्या पावसामध्ये पूल कोसळला आहे. त्यामुळे राहुरीला येण्याजाण्याचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे प्रशासनाला जाग येण्यासाठी केंदळ बुद्रुक व आरडगांव येथील ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने गांधीगिरी आंदोलन करण्याचा निर्माण हाती घेतला आहे. यानंतरही प्रशासनाला जाग आली नाही तर रीतसर तहसीलदार यांना लेखी निवेदन देऊन शनिवारी (दि. २५) आरडगाव सबस्टेशन येथे मुख्य रस्ता जेसीबीच्या साहाय्याने खोदून बंद करण्यात येईल.
विशाल तारडे, हरिभाऊ डोंगरे, अविनाश यादव, सोमनाथ भांड, अच्युतराव बोरकर, जनार्दन तारडे, बापू भुसे, पोपट तारडे, कृष्णा तारडे, बालू भुशे, नवनाथ कैतके, चंद्रकांत तारडे, गणेश भांड, समीर तारडे, महेंद्र तारडे, उत्तम राऊत, रामेश्वर तारडे, ज्ञानदेव तारडे, संदीप पवार, रामेश्वर कैतके, सुनील भापकर, नामदेव कैतके, कचरू आढाव, सचिन धसाळ यांनी दिला आहे.