शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंद्यात तहसीलदारांसमोरच शाब्दिक चकमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:39 IST

श्रीगोंदा : तहसील कार्यालयात रेशनकार्डची किंमत दोनशे ते पाचशे रुपये झाली आहे. त्यामुळे दाम देणार त्याचे काम ताबडतोब होणार, ...

श्रीगोंदा : तहसील कार्यालयात रेशनकार्डची किंमत दोनशे ते पाचशे रुपये झाली आहे. त्यामुळे दाम देणार त्याचे काम ताबडतोब होणार, अशी प्रथा येथे पडली आहे. इतर नागरिक सहा महिन्यांपासून प्रतीक्षा यादीत आहेत. या प्रकारामुळे बुधवारी तहसीलदार प्रदीप पवार यांच्या समोरच अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.

श्रीगोंदा तालुक्यात दरमहा तीनशे ते साडेतीनशे नवीन अथवा दुबार रेशनकार्डची मागणी होते. मात्र, शासनाकडून दोनशेच नवीन रेशनकार्ड मिळतात. त्यामध्ये लवकर कार्ड मिळण्यासाठी काही जण हस्तक्षेप करतात. त्यामुळे रेशनकार्ड वितरणात काळाबाजार होतो. या काळ्या बाजारात सामान्य नागरिक भरडला जात आहे. त्याचे पडसाद बुधवारी उमटले.

पुरवठा विभागात दत्तात्रय साळुंके हे एकटेच पुरवठा निरीक्षक आहेत. त्यांच्या हाताखाली एकही लेखनिक नाही. त्यामुळे त्यांना झीरो कर्मचारी नेमून हे काम करावे लागते. त्यामुळे रेशनकार्ड वितरणात काळा बाजार होत आहे. या विभागातील रिक्त पदे भरणे आवश्यक आहे.

रेशनकार्ड वितरणाचा वाद तहसीलदार प्रदीप पवार यांच्या दरबारात गेला. त्यावर पुरवठा निरीक्षकाने एका नायब तहसीलदारावर शब्दांचा भडीमार केला.

---

तहसील कार्यालयात नऊ पदे रिक्त आहेत. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांची कामे थांबू नयेत. दक्षता घेतली जात आहे. पुरवठा विभागातील रेशनकार्ड वितरणाचा आढावा घेऊन प्रलंबित रेशनकार्ड लवकर देण्याची व्यवस्था केली जाईल.

प्रदीप जाधव,

तहसीलदार, श्रीगोंदा.