पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील प्राथमिक मराठी शाळा, माध्यमिक विद्यालय, ग्रामपंचायत कार्यालय आदी ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जय भवानी, जय शिवरायचा जयघोष करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या शाळेतही मुख्याध्यापिका सुरेखा लुटे आणि फौजिया पठाण यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी उर्दूचे मुख्याध्यापक जमीर शेख, शिवव्याख्याते अशोकराव नांदे, प्रदीप तांबे, किशोर बनकर, धम्मपाल घनबहादूर, सुहास धनेधर आदी शिक्षक उपस्थित होते.
माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संजय पवार, बाळासाहेब जाधव, ज्ञानेश्वर तुवर, आयुब शेख, सुनील शिंदे, बापूसाहेब जाधव, वैभव गजघाट, श्रीमती मीरा गुरसळ, मंदा तुवर, योगेश तुवर आदींसह विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
पाचेगाव ग्रामपंचायत कार्यालयातही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब गोरे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच श्रीकांत पवार, शिवाजी कांबळे, दिगंबर क्षीरसागर, प्रकाश मांजरे, राहुल पाटील, रंगनाथ कुचेकर, डॉ. संतोष आगळे, सत्तार पटेल, उमेश कहार, रामेश्वर पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.