१६ जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरण मोहीम सुरू झाली. प्रारंभी आरोग्य कर्मचारी, नंतर फ्रंटलाइन वर्कर व नंतर ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली. मध्यंतरी १८ ते ४४ हा टप्पाही सुरू झाला होता; परंतु नंतर तो बंद करण्यात आला. दरम्यान, सध्या ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस देण्यात येत आहे. दरम्यान, आता लसीकरणाचा पुढचा टप्पा जाहीर झाला असून, यात ३० ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणासाठी नोंदणीची आवश्यकता नसून थेट केंद्रावर जाऊनही नागरिकांना लस घेता येणार आहे. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात ६ लाख २३ हजार ८४ जणांनी पहिला, तर १ लाख ८० हजार ७४ जणांनी दुसरा, असे एकूण ८ लाख ३ हजार १५८ लसीचे डोस देण्यात आले आहेत.
आजपासून ३० वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:15 IST