शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या ३७ लाखांची लाभार्थ्यांकडून उधळपट्टी

By admin | Updated: August 24, 2016 00:39 IST

संदीप रोडे , श्रीरामपूर: स्वच्छ महाराष्ट्र अभियान योजनेंतर्गत श्रीरामपूर नगरपालिकेने प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान शौचालय बांधकामासाठी मंजूर करून

संदीप रोडे , श्रीरामपूर: स्वच्छ महाराष्ट्र अभियान योजनेंतर्गत श्रीरामपूर नगरपालिकेने प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान शौचालय बांधकामासाठी मंजूर करून त्यातील सहा हजार रुपये लाभार्थ्यांच्या बॅँक खात्यात वर्ग केले. बॅँक खात्यात पैसे वर्ग होऊन आठ महिने उलटले, तरी अजूनपर्यंत शौचालयाची साधी विटही उभी राहिलेली नाही. या अनुदानाची लाभार्थ्यांकडून उधळपट्टी झाल्याचे निदर्शनास आल्याने नगरपालिकेने आता फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान योजनेंतर्गत राज्य शासनाने स्वच्छ महाराष्ट्र अभियान योजना राबविण्यास सुरूवात केली. मे २०१५ मध्ये त्याचा अध्यादेश निघाला. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच श्रीरामपुरात नगरपालिकेच्या माध्यमातून योजनेला सुरूवात झाली. ज्यांच्याकडे शौचालय नाही अशा नागरिकांना शौचालय बांधकामासाठी केंद्र व राज्य सरकारकडून १२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. शिवाय नगरपालिकाही त्यात काही रक्कम टाकणार आहे. नगरपालिका किती रक्कम टाकणार याचा ठराव होणे अजून बाकी आहे. तूर्तास शासनाचे १२ हजार रुपये लाभार्थ्यांच्या बॅँक खात्यात वर्ग केले जात आहेत. १ हजार ८७६ नागरिकांनी या योजनेंतर्गत नगरपालिकेकडे अनुदानासाठी अर्ज दाखल केले. त्यांना प्रत्येकी १२ हजार रुपये अनुदान नगरपालिकेने मंजूर केले. ६ हजार रुपयांचा पहिला हप्ता खात्यात वर्ग केला. त्यातील १ हजार २५० नागरिकांनी प्रत्यक्षात शौचालये बांधली. अर्थात १२ हजार रुपयांत विटाचे शौचालय होणार नाही, त्यामुळे काहींनी रेडिमेड शौचालय उभारले. ६२६ लाभार्थ्यांच्या बॅँक खात्यात ३७ लाख ५६ हजार रुपये वर्ग करून आठ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला तरीही त्यांनी शौचालय उभारले नाही. सरकारचे अनुदान रुपाने बॅँक खात्यात जमा झालेल्या प्रत्येकी सहा हजार रुपये रकमेची लाभार्थ्यांकडून उधळपट्टी करण्यात आली. आता आणखी सहा हजार रुपये येतील त्यातून बांधकाम करू याची वाट ते पाहताहेत. मात्र शौचालय बांधकाम सुरू झाल्याचा पुरावा दाखविल्याशिवाय पुढील सहा हजार रुपये नगरपालिका देईना. त्यामुळे या लाभार्थ्यांनी शौचालय बांधण्याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी पालिकेने या लाभार्थ्यांना बांधकाम करा अन्यथा फौजदारी कारवाईस तयार रहा, अशा नोटिसा पाठवल्या आहेत. महिनाभरात नगरपालिका पुन्हा फेरसर्व्हे करणार आहे. त्यात शौचालय उभारले नसल्याचे निदर्शनास आले तर मग मात्र सरकारी निधीचा गैरवापर केला म्हणून थेट पोलिसात तक्रार दाखल केली जाणार आहे.