शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी शाळेत बसण्याचे फर्मान; नगरमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 14:03 IST

जिल्ह्यातील तीन उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना बेधडक मराठी माध्यमात समायोजित करण्याचे फर्मान शिक्षण विभागाने काढल्याने शिक्षण विभागाचाही गोंधळ उडाला आहे. अकोल्यातील दुर्गम भागात रस्ताच नसल्याने दुस-या शाळेत मुलांना पाठवायचे कसे, असा प्रश्न शिक्षकांसमोर आहे.

अण्णा नवथरअहमदनगर : शैक्षणिक दर्जा राखण्यासाठी अत्याल्प पटसंख्येच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या समायोजनेत अनेक त्रुटी निर्माण झाल्याचे चित्र पुढे आले असून, जिल्ह्यातील तीन उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना बेधडक मराठी माध्यमात समायोजित करण्याचे फर्मान शिक्षण विभागाने काढल्याने शिक्षण विभागाचाही गोंधळ उडाला आहे. अकोल्यातील दुर्गम भागात रस्ताच नसल्याने दुस-या शाळेत मुलांना पाठवायचे कसे, असा प्रश्न शिक्षकांसमोर आहे.अत्याल्प पटसंख्येच्या जिल्ह्यातील ४९ शाळांना कायमचे कुलूप लागणार आहे़ शिक्षण विभागाच्या आदेशाची खातरजमा करता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानेही या शाळा बंद करण्याचे आदेश स्थानिक अधिका-यांना देऊन टाकले आहेत. प्रत्यक्षात समायोजन करताना दोन शाळांतील अंतर, शिक्षणाचे माध्यम, अस्तित्वात नसलेल्या शाळांचा संदर्भ, समायोजनासाठी सुचविलेल्या शाळांपेक्षा इतर शाळांचे अंतर कमी असणे, पर्यायी शाळेत जाण्यासाठी रस्त्यांचा अभाव, अशा व अन्य बाबी विद्यार्थ्यांच्या समायोजनात गोंधळ निर्माण करणा-या ठरत असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.शिक्षण विभागाच्या आदेशाने जिल्ह्यातील ३८८ विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी जवळच्या शाळेत जावे लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या समायोजनेचे काम स्थानिक पातळीवर हाती घेण्यात आले आहे. समायोजनेत अनेक त्रुटी असल्याचे समोर येऊ लागल्याने शिक्षण विभागाचाच गोंधळ उडाला आहे.शाळा बदल करताना एक किलोमीटरचे अंतर ठेवण्याची शिक्षणाचा अधिकरांतर्गत असलेली एक किलोमीटरची तरतूदही बेदखल करण्यात आली आहे. अकोल्यात दोन शाळांतील २ ते ३ किलोमीटरहून अधिक आहे़ इतक्या दूरवर मुलांना शाळेत सोडण्याची जबाबदारी घेणार कोण, हा प्रश्नही अनुत्तरित आहे. पाथर्डी तालुक्यातील माळीबाभूळगाव येथे उर्दू माध्यमाची शाळा आहे. त्यातील विद्यार्थ्यांचे समायोजन अन्य उर्दू शाळेत न करता मराठी शाळेत करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. संगमनेर तालुक्यातील निमोण, तर राहाता तालुक्यातील दाढ बु., येथील उर्दू माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे समायोजन मराठी शाळेत करा, असा शिक्षण विभागाचा आदेश आहे. कर्जत तालुक्यातील शिंदे वस्तीवरील सेमी इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांचे समायोजन चापडगाव वस्तीवरील मराठी शाळेत करण्याच्या आदेशाने शिक्षक व पालकही अवाक् झाले आहेत.

अकोल्यात समायोजनाचा प्रश्न गंभीर

अकोले तालुक्यातील १४ शाळांतील विद्यार्थ्यांचे समायोजन करताना रस्ते, मूळ शाळा जास्तीचे अंतर, मुलांना शाळेत सोडविणे, यासारख्या अडचणी येत असून, या तालुक्यात शाळांचा प्रश्न गंभीर बनला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरzp schoolजिल्हा परिषद शाळा