धर्माधिकारी मळा परिसरात कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता, बांधण्यात येत असलेल्या मोबाइल टॉवरला आरोग्यावर दुष्परिणाम होण्याच्या भीतीने स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला होता. सर्व नियम धाब्यावर बसवून मोबाइल टॉवरचे काम सुरू होते. सदर टॉवरचे काम बंद करण्यासाठी संघटनेने स्थानिक नागरिकांसह प्रेमदान चौकात रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाची दखल घेत तोफखाना पोलिसांनी सदर जागा मालकास बोलावून घेतले. सदर कामासाठी जिल्हाधिकारी व मनपा प्रशासनाची परवानगी नसल्याने सुरू असलेले मोबाइल टॉवरचे काम बंद करण्याची नोटीस बजावली, तर मनपा कर्मचाऱ्यांनीही मोबाइल टॉवरची पाहणी करून पंचनामा केला. मोबाइल टॉवरचे काम थांबविण्यासाठी अॅड.गवळी, ललीता गवळी, वसुधा शिंदे, प्रकाश हजारे, माधवी दांगट, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले आदींनी प्रयत्न केले.
अनधिकृत मोबाइल टॉवरचे काम पाडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:22 IST