निघोज : पारनेर तालुक्यातील निघोज येथील राहुल अमृता रसाळ यांना राज्य शासनाकडून दिला जाणारा प्रतिष्ठेचा उद्यान पंडित पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांसाठी असे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. राहुल रसाळ यांनी द्राक्ष व डाळिंब शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग राबविले आहेत. त्यांच्याकडे ४५ एकर शेती आहे. त्यापैकी २० एकर द्राक्ष, तर १० एकर डाळिंब आहे. उर्वरित १५ एकरवर ते भाजीपाला पिकवितात. राहुल हे कृषी पदवीधर असून, त्यांनी आठ देशांचा शेती अभ्यास दौरा केलेला आहे. त्यांनी ब्राझील येथील नावाजलेल्या क्रीमसन द्राक्ष वाणाची लागवड केली आहे. निघोज परिसरात कुकडी प्रकल्पाचे पाणी आल्यानंतर १९९०ला त्यांचे वडील अमृता रसाळ यांनी प्रथमच डाळिंब व द्राक्षबाग लागवड केली होती. आधुनिक शेतीचे बाळकडू त्यांना वडिलांकडूनच मिळाल्याचे ते सांगतात.
--
०१ राहुल रसाळ