आश्वी : दुचाकीने दिलेल्या धडकेत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना आश्वी खुर्द येथे घडली. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात कार्यरत असलेले देवीदास दगडू वाकचौरे (रा. रूंभोडी, ता. अकोले) हे आश्वी बुद्रूक गावातील कुंभारगल्लीत वास्तव्यास होते. शनिवारी रात्री जेवण झाल्यानंतर नियमितपणे शतपावली करण्यासाठी पानोडीहून आश्वीकडे भरधाव वेगात जाणार्या दुचाकीवरील (क्रमांक एम.एच.१७, बी.बी.५६0४) चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने वाक्चौरे यांना जोराची धडक दिली. जखमी अवस्थेत त्यांना प्रवरा ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दुचाकी चालक बाबासाहेब भाऊसाहेब कदम यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (वार्ताहर)
दुचाकीच्या धडकेने शिक्षक ठार
By admin | Updated: November 24, 2014 13:16 IST